उपवासाचा हांडवो | Upwas Handwo Recipe in Marathi

प्रेषक Archana Chaudhari  |  5th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Upwas Handwo recipe in Marathi,उपवासाचा हांडवो, Archana Chaudhari
उपवासाचा हांडवोby Archana Chaudhari
 • तयारी साठी वेळ

  30

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

6

0

उपवासाचा हांडवो recipe

उपवासाचा हांडवो बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Upwas Handwo Recipe in Marathi )

 • रताळ १/२ कप उकडून किसून घेतलेले
 • हिरवी मिरची पेस्ट १टीस्पून
 • लिंबू रस १टीस्पून
 • आरारूट २ टेबलस्पून
 • बटाटा १/२ कप उकडून किसून घेतलेले
 • लाल तिखट २ टीस्पून
 • लिंबू रस १ टीस्पून
 • आरारूट २ टेबलस्पून
 • पनीर १/२ कप किसून घेतलेले
 • हिरवी मिरची २
 • जिरे १/२ टीस्पून
 • मीठ चवीनुसार
 • चटणीसाठी
 • ताजे खोबरे ४ टेबलस्पून किसून घेतलेलं
 • हिरवी मिरची ३
 • लिंबू १/२
 • साखर १ टीस्पून
 • मीठ चवीनुसार
 • तेल १ टेबलस्पून (पॅन मधे टाकण्यासाठी)

उपवासाचा हांडवो | How to make Upwas Handwo Recipe in Marathi

 1. रताळ्याचा लेअर करण्यासाठी रताळ्याच्या किसामध्ये हिरवी मिरची पेस्ट, लिंबू रस,आरारूट,मीठ टाकून गोळा बनवा.
 2. बटाट्याच्या लेअर साठी बटाट्याच्या किसामध्ये लाल तिखट,लिंबू,आरारूट,मीठ टाकून गोळा बनवा.
 3. पनीर च्या लेअर साठी आधी हिरवी मिरची आणि जिरे कुटून घ्या.
 4. पनीर च्या किसामध्ये वरील मिरची,जिरे कुटलेले,मीठ घालून गोळा बनवून घ्या.
 5. तिन्ही लेअर तयार आहे.
 6. चटणीसाठीचे साहित्य मिक्सरमधून फिरवून बारीक पेस्ट करून घ्या.
 7. आता नॉनस्टिक पॅन मध्ये थोडेसे तेल टाका.
 8. एका प्लास्टिकच्या कागदावर रताळ्याच्या लेअर चा गोळा थापून वरील पॅन मध्ये टाका.
 9. त्यावर २ टीस्पून चटणी पसरवा.
 10. आता प्लास्टिकच्या कागदावर बटाट्याच्या लेअर चा गोळा थापा.
 11. पॅनमधील रताळ्याच्या लेअर वर टाका.
 12. परत २ टीस्पून चटणी पसरवा.
 13. आता पनीर च्या लेअर चा गोळा प्लास्टिकच्या कागदावर थापा.
 14. पॅनमधील रताळ्याच्या, बटाट्याच्या लेअर टाका.
 15. थोडे तेल टाका.
 16. झाकून १५ मिनिटे कमी आचेवर ठेवा.
 17. आता हांडओ संपूर्ण उलटा करून परत थोडे तेल टाकून परत १५ मिनिटे कमी आचेवर झाकून ठेवा.
 18. खरपूस भाजल्यावर गरम गरम चटणी सोबत सर्व्ह करा.

My Tip:

कापण्यासाठी पिझ्झा कटर चा वापर केल्यास छान कापला जातो.

Reviews for Upwas Handwo Recipe in Marathi (0)