नारळ आणि भाजलेले शेंगदाण्याची पोप्स | Coconut and Roasted Peanut Pops Recipe in Marathi

प्रेषक Lata Lala  |  6th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Coconut and Roasted Peanut Pops recipe in Marathi,नारळ आणि भाजलेले शेंगदाण्याची पोप्स, Lata Lala
नारळ आणि भाजलेले शेंगदाण्याची पोप्सby Lata Lala
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

3

0

नारळ आणि भाजलेले शेंगदाण्याची पोप्स recipe

नारळ आणि भाजलेले शेंगदाण्याची पोप्स बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Coconut and Roasted Peanut Pops Recipe in Marathi )

 • 2 कप कोरडे नारळ पावडर (डेसिकेटेड कोकोनट )
 • 1 कप भाजलेले शेंगदाणे (बारीक वाटणे)
 • 1/4 कप मिल्कमेड किंवा अधिक
 • कोरडे नारळ पावडर पोप्स चा वर लावायला
 • आईस्क्राइम स्टिक्स किंवा कुल्फी स्टिक्स

नारळ आणि भाजलेले शेंगदाण्याची पोप्स | How to make Coconut and Roasted Peanut Pops Recipe in Marathi

 1. एका पातेल्यात कोरडे नारळ, भाजलेले शेंगदाणे आणि मिल्कमेड एकत्र करावं
 2. मिश्रण मध्यम आचेवर ठेवून परतावं. 
 3. पातेल्याच्या तळाला नारळ (मिश्रण) चिकटू नये म्हणून ढवळत राहावं. 
 4. मिश्रण एकजीव आणि घट्टसर होत आलं कि गॅस बंद करावा आणि पातेलं गॅसवरून उतरवावं.
 5. मिश्रण थोडे कोमटसर होऊ द्यावं. 
 6. थोडासा तूपाचा हात घेऊन पोप्स वळावेत.
 7. पोप्स वळून झाल्यावर त्यावर कोरडे नारळ लावावेत.

Reviews for Coconut and Roasted Peanut Pops Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo