उपवासाचे थालीपीठ | Upvasache Thalipith Recipe in Marathi

प्रेषक Bharti Kharote  |  6th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Upvasache Thalipith recipe in Marathi,उपवासाचे थालीपीठ, Bharti Kharote
उपवासाचे थालीपीठby Bharti Kharote
 • तयारी साठी वेळ

  30

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

उपवासाचे थालीपीठ recipe

उपवासाचे थालीपीठ बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Upvasache Thalipith Recipe in Marathi )

 • एक वाटी भाजलेली भगर / वरई
 • अर्धी वाटी शेंगदाणे कूट
 • एक वाटी बटाटा खीस (कच्चा)
 • एक चमचा दही /लिंबाचा रस
 • 4/5 हिरव्या मिरच्या
 • अर्धी वाटी कोथंबीर चिरलेली
 • दोन चमचे ओले खोबरे खीस
 • चवीनुसार मीठ
 • आवश्यकतेनुसार पाणि
 • तेल आवश्यकतेनुसार

उपवासाचे थालीपीठ | How to make Upvasache Thalipith Recipe in Marathi

 1. वरई भाजून दह्यात अर्धा तास भिजवून घेतली.
 2. नंतर मिक्सर मधून थोडे थोडे पाणी घालून बारीक वाटून घेतली..
 3. त्यात बटाटा खीस शेंगदाणे कूट हिरव्या मिरच्या बारीक चिरून कोथिंबीर खोबरे खीस मीठ घातले. .
 4. त्यात पाणी घालून बॅटर तयार केले. .थोडे घट्टच बॅटर हवे. ..
 5. गॅस वर नाॅन स्टीक तवा तापत ठेवला .
 6. त्या वर ब्रशने तेल लावले..
 7. आता तव्यावर पळीने बॅटर पसरवले..
 8. सर्व बाजूंनी तेल सोडले..
 9. 2 मी.नी वरच्या बाजूवर तेल टाकले..
 10. नंतर पलटवले..परत सर्व बाजूंनी तेल सोडले. .
 11. छान खरपूस भाजून घेतले. .
 12. असेच सर्व थालीपीठ बनवले..
 13. आणि नारळाची चटणी आणि उपवासाची भाजी सोबत सर्व्ह केले. .एकदम झक्कास. ..

My Tip:

यात बटाटा खीस ऐवजी रताळी खीस पण वापरू शकता. ....

Reviews for Upvasache Thalipith Recipe in Marathi (0)