BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / उपवासाचे थालीपीठ

Photo of Upvasache Thalipith by Bharti Kharote at BetterButter
0
5
0(0)
0

उपवासाचे थालीपीठ

Aug-06-2018
Bharti Kharote
30 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उपवासाचे थालीपीठ कृती बद्दल

वरई पासून बनविलेले हे थालीपीठ अतिशय पौष्टिक लोकप्रिय आणि पारंपरिक आहे. .नवराञी मध्ये नऊ दिवसांचे उपवास असतात. .त्यात हा पदार्थ हमखास बनवतात. .खूप रूचकर लागतो...

रेसपी टैग

 • मध्यम
 • नवरात्र
 • महाराष्ट्र
 • शॅलो  फ्रायिंग
 • रोस्टिंग
 • मेन डिश
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

 1. एक वाटी भाजलेली भगर / वरई
 2. अर्धी वाटी शेंगदाणे कूट
 3. एक वाटी बटाटा खीस (कच्चा)
 4. एक चमचा दही /लिंबाचा रस
 5. 4/5 हिरव्या मिरच्या
 6. अर्धी वाटी कोथंबीर चिरलेली
 7. दोन चमचे ओले खोबरे खीस
 8. चवीनुसार मीठ
 9. आवश्यकतेनुसार पाणि
 10. तेल आवश्यकतेनुसार

सूचना

 1. वरई भाजून दह्यात अर्धा तास भिजवून घेतली.
 2. नंतर मिक्सर मधून थोडे थोडे पाणी घालून बारीक वाटून घेतली..
 3. त्यात बटाटा खीस शेंगदाणे कूट हिरव्या मिरच्या बारीक चिरून कोथिंबीर खोबरे खीस मीठ घातले. .
 4. त्यात पाणी घालून बॅटर तयार केले. .थोडे घट्टच बॅटर हवे. ..
 5. गॅस वर नाॅन स्टीक तवा तापत ठेवला .
 6. त्या वर ब्रशने तेल लावले..
 7. आता तव्यावर पळीने बॅटर पसरवले..
 8. सर्व बाजूंनी तेल सोडले..
 9. 2 मी.नी वरच्या बाजूवर तेल टाकले..
 10. नंतर पलटवले..परत सर्व बाजूंनी तेल सोडले. .
 11. छान खरपूस भाजून घेतले. .
 12. असेच सर्व थालीपीठ बनवले..
 13. आणि नारळाची चटणी आणि उपवासाची भाजी सोबत सर्व्ह केले. .एकदम झक्कास. ..

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर