शाबूदाना डिलाइट | Shabu dilaet Recipe in Marathi

प्रेषक priya Asawa  |  8th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Shabu dilaet recipe in Marathi,शाबूदाना डिलाइट, priya Asawa
शाबूदाना डिलाइटby priya Asawa
 • तयारी साठी वेळ

  30

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  3

  तास
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

शाबूदाना डिलाइट recipe

शाबूदाना डिलाइट बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Shabu dilaet Recipe in Marathi )

 • शाबूदाना 1/2 कप
 • साजुक तुप 1 चमचा
 • दुध 1 1/2 लीटर
 • साखर पाव कप
 • वेलची पूड 1/2 चमचा
 • सफरचंदाचे तुकडे 1 कप
 • रोज सीरप 2 चमचे
 • बारीक कापलेला मिक्स ड्रायफृट

शाबूदाना डिलाइट | How to make Shabu dilaet Recipe in Marathi

 1. शाबूदान्यात थोडे तुप घालुन भाजुन घ्या
 2. 1/2 लिटर दूध फ्रिज मध्ये गार होण्यासाठी ठेवा
 3. नंतर भाजुन घेतलेल्या शाबुदान्यात 1 कप दुध मिक्स करून 1/2 तास भिजवून ठेवा
 4. 1/2 तासानंतर भिजवलेल्या शाबुदान्यात राहिलेला दुध टाकून दुध चांगले आटवून घ्या दुधाचे प्रमाण आर्धा झाला पाहिजे तोपर्यंत आटवून घ्या
 5. व त्याच्यात साखर, वेलची पूड, व ड्रायफृट टाकून 2 मिनिट अजून शिजवून घ्या
 6. मिश्रण गार झाल्यावर काचेच्या ग्लास तिरपे पकडा व त्याच्यात मिश्रण टाका व ग्लास तसेच तिरपे करुनच फ्रिजर मध्ये 1 तास साठी सेट करायल ठेवा
 7. एक तासानंतर
 8. जे दुध फ्रिज मध्ये गार करायला ठेवले होते ते काढा व त्याच्यात रोज सिरप व साखर टाकून मिक्सी फिरवून घ्या
 9. सेट करायला ठेवलेले ग्लास बाहेर काढा आपले मिश्रण छान सेट झाले आहे
 10. आता तयार केलेले रोज मिल्क शेक ग्लास मध्ये हळुच टाका व त्याच्या वरुन सफरचंदाचे तुकडे व ड्रायफृट टाकून सर्व करा

My Tip:

मिल्क शेक तुम्हाला जो फ्लेवर आवडत असेल तो तुम्ही करू शकता व फ्रुट पण तुम्हाला जे आवडते ते तुम्ही घेउ शकता

Reviews for Shabu dilaet Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo