उपवसाचा बटाट्याचा चिवडा | Batata chiwada Recipe in Marathi

प्रेषक Aarya Paradkar  |  9th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Batata chiwada recipe in Marathi,उपवसाचा बटाट्याचा चिवडा, Aarya Paradkar
उपवसाचा बटाट्याचा चिवडाby Aarya Paradkar
 • तयारी साठी वेळ

  25

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

उपवसाचा बटाट्याचा चिवडा recipe

उपवसाचा बटाट्याचा चिवडा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Batata chiwada Recipe in Marathi )

 • 7-8 मध्यम आकाराचे बटाटे
 • 2 चिमुटभर खायचा सोडा
 • 1/2 वाटी मिरची तुकडे
 • 2-3 चमचे पिठी साखर
 • 1/2 वाटी बदाम काजू, बेदाणे
 • मीठ चवीनुसार
 • तळण्यासाठी तूप / शेंगदाणा तेल

उपवसाचा बटाट्याचा चिवडा | How to make Batata chiwada Recipe in Marathi

 1. प्रथम बटाटे खिसून घेऊन खायचा सोडा घातलेल्या पाण्यात 10-15 मि. ठेवून नंतर त्यातील पाणी काढून स्वच्छ कपड्यावर पसरवून ठेवणे
 2. नंतर तूप गरम करून बटाटा खिस कुरकुरीत तळून घ्या
 3. बदाम, काजू, बेदाणे तळून घ्या
 4. नंतर तुपात मिरची ची फोडणी करून घ्या
 5. एका मोठ्या भांड्यात तळलेला बटाटा खिस घेऊन त्यात चवीप्रमाणे मीठ, पिठी साखर ,तळलेले बदाम, काजू, बेदाणे व मिरचीची फोडणी घालून चांगले मिक्स करावे
 6. फराळी चिवडा तयार

My Tip:

याप्रमाणेच फणसाच्या गर्याचा चिवडा करावा

Reviews for Batata chiwada Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo