शिंगाडा पिठाची मसाला पुरी | Pharali Water Chestnut Masala Puri Recipe in Marathi

प्रेषक Sujata Hande-Parab  |  10th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Pharali Water Chestnut Masala Puri recipe in Marathi,शिंगाडा पिठाची मसाला पुरी, Sujata Hande-Parab
शिंगाडा पिठाची मसाला पुरीby Sujata Hande-Parab
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    20

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

2

0

शिंगाडा पिठाची मसाला पुरी recipe

शिंगाडा पिठाची मसाला पुरी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Pharali Water Chestnut Masala Puri Recipe in Marathi )

  • शिंगाडा पीठ – ३/४ - १ कप •
  • बटाटा उकडलेला आणि किसलेला किंवा मॅश केलेला - १ मध्यम किंवा १/२ वाटी  •
  • मीठ किंवा सैंधव मीठ चवीनुसार •
  • साखर - १/४ टीस्पून •
  • लिंबाचा रस – १ टीस्पून •
  • किसलेले आले - १ टीस्पून  •
  • हिरवी मिरची - १-२ जाडसर वाटून घेतलेली
  • भाजलेला जाडसर वाटलेला जिरा - १/२ टीस्पून •
  • भाजलेले आणि जाडसर भरड केलेले शेंगदाणे - ३-४ टेबलस्पून •
  • तेल – २ कप - फ्रयिंग 
  • पाणी पीठ मळण्यासाठी - १/४ थ कप किंवा गरजेनुसार 
  • सर्विंग साठी - फ्रेश खोबरे मिरची चटणी किंवा भाजलेल्या शेंगदाण्याची चटणी

शिंगाडा पिठाची मसाला पुरी | How to make Pharali Water Chestnut Masala Puri Recipe in Marathi

  1. सगळ्या सांगितलेल्या वस्तू तेल आणि पाणी सोडून मिक्स करून घ्या.
  2. लागत असेल तरच पाणी घाला आणि पीठ मळून घ्या.
  3. थोडा वेळ ५ मिनिटे झाकून ठेवा. पिठाचे सामान आकाराचे छोटे गोळे करून घ्या. पीठ हाताला चिकटत असल्यास थोडे तेल लावून घ्यावे.
  4. पोळपाटावर प्लास्टिक किंवा मलमलच्या कापडयाला पाणी लावून छोट्या पुऱ्या लाटून घ्या.
  5. एका कढई मध्ये मध्यम कमी आचेवर तेल गरम करून त्यात बनवलेल्या पुऱ्या व्यवस्तीत दोन्ही बाजूने लालसर होई पर्यंत टाळून घ्या. तेल जास्त गरम करू नका.
  6. ताज्या खोबऱ्याचा चटणी किंवा शेंगदाण्याच्या चटणी बरोबर गरमा गरम सर्व्ह करा.

My Tip:

पुरी साठी पीठ घट्ट मळावे.

Reviews for Pharali Water Chestnut Masala Puri Recipe in Marathi (0)