मोतीया साबुदाणा खिचडी | Sabudana khichdi Recipe in Marathi

प्रेषक Renu Chandratre  |  10th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Sabudana khichdi recipe in Marathi,मोतीया साबुदाणा खिचडी, Renu Chandratre
मोतीया साबुदाणा खिचडीby Renu Chandratre
 • तयारी साठी वेळ

  5

  तास
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

2

0

मोतीया साबुदाणा खिचडी recipe

मोतीया साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Sabudana khichdi Recipe in Marathi )

 • साबुदाणा २ वाटी
 • तूप १ मोठा चमचा
 • बटाटा १ सोलून बारीक चिरलेला
 • जीरे १ चमचा
 • हिरवी मिरची चे तुकडे २ चमचे
 • साखर २ चमचे
 • मीठ चवीनुसार
 • लाल तिखट १/२ चमचा
 • दाण्याच कूट १-२ मोठा चमचा
 • कोथिंबीर सजावटी करता
 • लिंबाचा रस २ -४ चमचे

मोतीया साबुदाणा खिचडी | How to make Sabudana khichdi Recipe in Marathi

 1. सर्वप्रथम साबुदाणा धुवून , १/२ पाण्यात ५-६ तास भिजवून ठेवा
 2. नंतर भिजलेला साबुदाणा हाताने मोकळा करून घ्या
 3. कढईत तूप गरम करावे, जीरे आणि हिरवी मिरची घालावी
 4. बटाट्याचे काप घालून , झाकून २ मिनिटे शिजवा
 5. लगेच भिजलेला साबुदाणा , मीठ, लाल तिखट, दाण्याचं कूट , आणि साखर घालावी
 6. व्यवस्थित मिक्स करावे आणि झाकून ५ मिनीटे मंद आचेवर शिजवा
 7. झाकण काढून लिंबाचा रस आणि कोथिंबीर घालावी
 8. लगेच गरमा गरम सर्व्ह करावे

My Tip:

लिंबाचा रस शेवटी घालावे , नाहीतर खिचडी कडू होऊ शकते

Reviews for Sabudana khichdi Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo