उपवास दहीवडा | Fasting curd vada Recipe in Marathi

प्रेषक Teju Auti  |  11th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Fasting curd vada recipe in Marathi,उपवास दहीवडा, Teju Auti
उपवास दहीवडाby Teju Auti
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

2

0

उपवास दहीवडा recipe

उपवास दहीवडा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Fasting curd vada Recipe in Marathi )

 • ४ बटाटे
 • २ चमचे वरईचे पीठ
 • ४ हिरवी मिरची
 • १ चमचा जिरे
 • आल
 • मीठ कोथिंबिर
 • १ वाटी दही
 • १ चमचा गोड चिंचेची चटणी
 • १ चमचा साखर

उपवास दहीवडा | How to make Fasting curd vada Recipe in Marathi

 1. प्रथम ४ बटाटे उकडून कुसकरून घेतल.हिरव्या मिरच्या आणि आलं याची पेस्ट तयार करून घेतली.
 2. एका बाऊलमध्ये मँश केलेले बटाटे, वरईचे पीठ, हिरवी मिरची आणि आलं पेस्ट, जिरे, मीठ, कोथिंबिर घालून मिक्स करून घेतले.
 3. छोटे छोटे वडे करून घेतले.नंतर हे वडे आप्पे पात्रात थोडे तेल घालून दोन्ही बाजूंनी गोल्डन ब्राऊन करून घेतले.
 4. आता २ वाटी दही, १ चमचा साखर, मीठ टाकून छान मिक्स करून घेतले.
 5. सर्व्हिंग प्लेटमध्ये तयार वडे घेऊन त्यावर दही, गोड चिंचेची चटणी कोथिंबिरीने प्लेट सजवून डिश सर्व्ह करा.

Reviews for Fasting curd vada Recipe in Marathi (0)