दही - वरी जिरा भात | Curd -Barnyard Millet (Bhagar) Jira Rice Recipe in Marathi

प्रेषक Sujata Hande-Parab  |  13th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Curd -Barnyard Millet (Bhagar) Jira Rice recipe in Marathi,दही - वरी जिरा भात, Sujata Hande-Parab
दही - वरी जिरा भातby Sujata Hande-Parab
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

दही - वरी जिरा भात recipe

दही - वरी जिरा भात बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Curd -Barnyard Millet (Bhagar) Jira Rice Recipe in Marathi )

 • वरी जिरा भात - भगर किंवा वरीचा तांदूळ - ३/४ कप
 • तूप - १/२ टेबलस्पून 
 • सैंधव मीठ - चवीनुसार 
 • हिरवी मिरची - १/२ टेबaलस्पून - बारीक तुकडे केलेली 
 • जिरे - १ टीस्पून 
 • पाणी - १ - १ १/२ कप शिजवण्यासाठी 
 • तडका दही साठी - दही - १ कप
 • जिरे - १/४ टीस्पून
 • हिरवी मिरची - १ टीस्पून
 • आले - १ टीस्पून किसलेले 
 • सैंधव मीठ चवीनुसार 
 • तेल - १/२ - १ टीस्पून

दही - वरी जिरा भात | How to make Curd -Barnyard Millet (Bhagar) Jira Rice Recipe in Marathi

 1. वरीचा तांदूळ चांगला धुवून चाळणीने पाणी काढून टाका.
 2. एका टोपात किंवा पॅन मध्ये तूप टाकून त्यात जिरे टाकून तडतडू द्या.
 3. मिरची टाकून २-३ सेकंड ढवळून घ्या. धुऊन घेतलेला वरीचा तांदूळ आणि मीठ घालून ढवळ.
 4. पाणी टाकून तो ४-५ मिनिटे माधयम आचेवर शिजवून घ्या. मध्ये मध्ये ढवळत राहा.
 5. थोडा सुकल्यानंतर आणि भात नरम झाल्यावर गॅस बंद करून टाका.
 6. टोपावर झाकण ठेवून २-३ मिनिटे तसेच राहू द्या. झाकण काढून थोडावेळ तसेच राहू द्या.
 7. फोडणीच्या दह्यासाठी - एका वाडग्यात दही आणि मीठ चांगले फेटून घ्या.
 8. एका पॅन मध्ये तेल टाकून त्यात जिरे टाकून तडतडू द्या.
 9. त्यात बारीक कापून घेतलेली मिरची आणि किसलेले आले टाकून थोडे परतून घ्या.
 10. केलेला तडका दह्यावर ओता.
 11. गरमा गरम जिरा वरी भाताबरोबर सर्व्ह करा.

Reviews for Curd -Barnyard Millet (Bhagar) Jira Rice Recipe in Marathi (0)