उपवासाची फ्रुट पाणीपुरी | Fasting fruit pani puri Recipe in Marathi

प्रेषक Seema jambhule  |  17th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Fasting fruit pani puri recipe in Marathi,उपवासाची फ्रुट पाणीपुरी, Seema jambhule
उपवासाची फ्रुट पाणीपुरीby Seema jambhule
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  25

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

9

0

उपवासाची फ्रुट पाणीपुरी recipe

उपवासाची फ्रुट पाणीपुरी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Fasting fruit pani puri Recipe in Marathi )

 • शिंगाड्याचे पीठ 1 वाटी
 • बेकिंग सोडा चिमूटभर
 • उपवासाचे मीठ चवीनुसार
 • तेल
 • डाळिंबाचे दाणे 1 वाटी
 • हिरवी मिर्ची पाव तुकडा
 • अद्र्क पाव तुकडा
 • काळ मीठ छोटा पाव चमचा
 • पुदिनाची पाने 3-4
 • साखर 1/2 चमचा
 • जिरे पावडर छोटा पाव चमचा
 • लिंबू रस 1 1/2 चमचा

उपवासाची फ्रुट पाणीपुरी | How to make Fasting fruit pani puri Recipe in Marathi

 1. सर्वात प्रथम पाणीपुरीचे पाणी तयार करणे साठी एक वाटी डाळिंबाचे दाणे घ्या
 2. त्यात पुदिनाचे पान , हिरवी मिर्चीचा आणि अद्र्कचा तुकडे , चवीनुसार काळ मीठ उपवासाचे मीठआणि लिंबू रस आणि जिरे पावडर टाका आणि मिक्सर ला लावुन वाटून घ्या
 3. आता वाटलेला मिश्रणात पाणी टाका व गळून घ्या
 4. त्यात चवीनुसार साखर टाकून मिक्स करा
 5. आता पुरी साठी शिंगाड्याचे पीठ घ्या
 6. त्या पिठात उपवासाचे मीठ , बेकिंग सोडा व तेल टाकून पीठ पाणी टाकून मळून व 10 मिनट बाजूला ठेवा
 7. आता माळेला पिठाचा गोळा बनवून हलके हाताने पोळी लाटून घ्या व त्याचे गोल पुरी कुकीज कटर ने कापून घ्या
 8. आता तेल गरम करा व गरम तेलात पुरी तळून घ्या... पुरी तळताना त्यावर तेल उडवत राहा म्हणाजे पुरी फुलून येते..
 9. आता सर्व पुरी तळून घ्या
 10. आता तुमचा आवडी नुसार फळे घ्या व त्याचे बारीक तुकडे करा आणि पाणीपुरी सोबत खायला द्या...

My Tip:

पाणीपुरी चे पाणी बनवताना त्यात हिरवी मिर्ची, अद्र्क,व पुदिनाची पान हे सर्व साहित्य चवीनुसार वापरा.. नाही तर चव बदलू शकते

Reviews for Fasting fruit pani puri Recipe in Marathi (0)