बटाटा साबु खिरी च्या पापड्या | Potato Sago Papad Recipe in Marathi

प्रेषक Bharti Kharote  |  19th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Potato Sago Papad recipe in Marathi,बटाटा साबु खिरी च्या पापड्या, Bharti Kharote
बटाटा साबु खिरी च्या पापड्याby Bharti Kharote
 • तयारी साठी वेळ

  48

  तास
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  5

  माणसांसाठी

2

0

बटाटा साबु खिरी च्या पापड्या recipe

बटाटा साबु खिरी च्या पापड्या बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Potato Sago Papad Recipe in Marathi )

 • एक किलो राञभर भिजवलेला साबुदाणा
 • पाव किलो बटाटे खिसून मीठ घालून राञभर पाण्यात ठेवलेले. .
 • चवीनुसार मीठ
 • आवश्यकतेनुसार पाणि
 • दोन टीस्पून जीरे

बटाटा साबु खिरी च्या पापड्या | How to make Potato Sago Papad Recipe in Marathi

 1. आदल्या दिवशी राञीच बटाटे खिसून साबुदाणा भिजत घालावा..
 2. सकाळी गॅस वर मोठ्या पातेल्यात अर्ध पातेलं पाणी उकळत ठेवावे. .त्यात मीठ घालून ऊकळी येऊ द्यावी..
 3. ऊकळी आल्या वर त्यात साबुदाणा आणि नितरून घेतलेला बटाटयाचा खिस आणिा जीरे घालावे. ..
 4. पळीने चांगल हलवून घ्याव. .खाली लागू देवु नये..चिकटपणा आल्या वर गॅस बंद करा. .
 5. उन्हात मेनकापड पसरवून त्या वर पळी च्या साहाय्याने पापड्या टाका...
 6. दोन दिवस कडक उन्हात वाळवावे ...
 7. ह्या पापड्या वर्षभर छान टिकतात. .
 8. गॅस वर कढाई ठेवा त्यात तेल तापवून पापड्या तळून घ्या. .आणि सर्व्ह करा..

My Tip:

यात तुम्ही लाल तिखट हिरव्या मिरच्या बारीक चिरून घालू शकता. .

Reviews for Potato Sago Papad Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo