उपासाची साबूदाणा सांडगी मिर्ची | Upasachi Sabudana Sandgi Mirchi Recipe in Marathi

प्रेषक Vaishali Joshi  |  19th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Upasachi Sabudana Sandgi Mirchi recipe in Marathi,उपासाची साबूदाणा सांडगी मिर्ची, Vaishali Joshi
उपासाची साबूदाणा सांडगी मिर्चीby Vaishali Joshi
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

उपासाची साबूदाणा सांडगी मिर्ची recipe

उपासाची साबूदाणा सांडगी मिर्ची बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Upasachi Sabudana Sandgi Mirchi Recipe in Marathi )

 • हिरव्या जाडसर मिरच्या १/२ किलो
 • साबूदाणा १ वाटी
 • शेंगदाणे कूट १/२ वाटी
 • जीर २ चमचे
 • मीठ १ १/२ चमचा
 • आल्या चा किस २ चमचे
 • १ लींबाचा रस

उपासाची साबूदाणा सांडगी मिर्ची | How to make Upasachi Sabudana Sandgi Mirchi Recipe in Marathi

 1. साबूदाणा रात्रभर भिजवून घ्या
 2. सकाळी गैस वर उकळत्या पाण्या वर चाळणी ठेवून साबूदाणा २-३ मिनिट वाफवून घ्या
 3. एक बाऊल मध्ये साबूदाणा काढून घ्या आणि थंड झाल्यावर त्यात किसलेले आल , मीठ , अक्ख जीर , शेंगदाणे कूट आणि लिंबू रस घालून मिक्स करुन सारण तयार करा
 4. मिरच्या मधून कापून घ्या
 5. प्रत्येक मिर्ची मध्ये सारण भरुन घ्या ५-६ दिवस उन्हात वाळवून घ्या .
 6. वाळल्यावर तयार आहे तळून खाण्या साठी उपासाची सांडगी मिर्ची
 7. शेंगदाणा तेलात किंवा तुपात तळून घेवुन सर्व्ह करा

Reviews for Upasachi Sabudana Sandgi Mirchi Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo