मुख्यपृष्ठ / पाककृती / Fasting Sushi

Photo of Fasting Sushi by Aarti Nijapkar at BetterButter
0
9
5(1)
0

Fasting Sushi

Aug-19-2018
Aarti Nijapkar
10 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • नवरात्र
  • फ्युजन
  • बॉइलिंग
  • स्टीमिंग
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. वरीच तांदूळ १/२ वाटी
  2. पाणी २ वाटी किंवा गरजेनुसार
  3. मीठ किंचित
  4. बटाट्याची भाजी
  5. उकडलेले बटाटे २ ते ३
  6. तूप १ चमचा
  7. जिरे १/२ लहान चमचा
  8. हिरवी मिरची १ ते २
  9. शेंगदाणे २ मोठे चमचे
  10. मीठ चवीनुसार
  11. साखर १/२ लहान चमचा

सूचना

  1. वरीचे तांदूळ स्वच्छ धुऊन घ्यावे
  2. मग पाणी घालून त्यात मीठ मिसळावे व गॅस वर ठेवून शिजवा
  3. आता तांदूळ वाफेवर छानसं शिजवून घ्या
  4. बटाट्याची भाजी
  5. पॅन तापवून त्यात तूप घाला जिरे , हिरवी मिरची घालून परतवून घ्या
  6. शेंगदाणे तुपावर भाजून घ्या
  7. वाफवलेले बटाटे सोलून त्याचे मध्यम आकाराचे काप करून घ्या
  8. कापलेले बटाटे पॅन मध्ये घालून एकत्र करून घ्या चवीनुसार मीठ व साखर घालून एकजीव करून झाकण ठेवून वाफवून घ्या
  9. भाजी झाली की एका ताटात काढून गार करून घ्या
  10. वरीचा भात शिजला की मध्यम गार करुन घ्या
  11. आता किचन पेपर किंवा एक सुती रुमाल भिजवून घट्ट पिळून घ्या व थोडं तेल लावून घ्या
  12. त्यावर भात पसरवून घाला व वरून थोडं दाबा
  13. एका बाजूला बटाट्याची भाजी घाला व रुमलाच्या किंवा पेपरच्या साहाय्याने घट्ट रोल करून घ्यावे
  14. घट्ट केलेला रोल १० मिनिटे ठेवावे मग रुमाल किंवा पेपर काढून गोलाकार कापुन घ्यावे
  15. एका ताटात ठेवून त्यावर हवं असेल तर उपवासाची हिरवी चटणी किंवा खजुराच्या चटणी सोबत खाऊ शकता

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
जयश्री भवाळकर
Dec-11-2018
जयश्री भवाळकर   Dec-11-2018

व्वा मस्त :ok_hand::ok_hand:

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर