मसाले भात | Masala Rice Recipe in Marathi

प्रेषक Bharti Kharote  |  22nd Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Masala Rice recipe in Marathi,मसाले भात, Bharti Kharote
मसाले भातby Bharti Kharote
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  25

  मि.
 • किती जणांसाठी

  5

  माणसांसाठी

2

0

मसाले भात recipe

मसाले भात बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Masala Rice Recipe in Marathi )

 • 2 फुलपाञ बासमती तांदुळ
 • एका कांद्याचे काप
 • एका बटाट्याचे काप
 • अर्धी वाटी ओल्या नारळाचे काप
 • 2 मोठे चमचे शेंगदाणे
 • 4/5 लवंगा
 • 4/5 काळी मीरे
 • 2 वेलदोडे
 • अर्धी वाटी हिरवे मटार
 • एक चमचा जीरे
 • अर्धा चमचा शहाजीरे
 • तीन तमाल पत्र
 • जेष्ठ मधाची काडी अर्धा ईंच
 • एक चमचा मोहरी
 • 4/5 पाकळ्या लसूण
 • दोन चमचे लाल तिखट
 • एक चमचा गरम मसाला
 • अर्धा चमचा हळद
 • पाव चमचा हिंग
 • चवीनुसार मीठ
 • आवश्यकतेनुसार पाणि
 • फोडणी साठी तेल

मसाले भात | How to make Masala Rice Recipe in Marathi

 1. गॅस वर कूकर ठेवा
 2. त्यात तेल टाकून तांदूळ सोडून बाकी सर्व फोडणी ला टाका..
 3. तेलात हे सर्व जिन्नस चांगले परतून घ्या. .
 4. त्यात लाल तिखट गरम मसाला हळद हिंग मीठ घालून 5 मी.शिजू दया. .
 5. तोपर्यंत तांदुळ स्वच्छ धूऊन घ्या. .
 6. दुसर्या गॅस वर एका पातेल्यात एक ग्लास पाणी गरम करायला ठेवा. .
 7. आता कूकर मध्ये तांदुळ घालून सर्व जिन्नस एकञ परतून घ्या. .
 8. सर्व नीट हलवून घ्या..
 9. आता गरम पाणी त्यात घाला. .
 10. चांगल हलवून घ्या. .
 11. कूकर ला झाकण लावून तीन शिट्ट्या करून घ्या. .
 12. 5 मी.नी झाकण काढून घ्या. .
 13. आता कोथिंबीर घालून डीश मध्ये सर्व्ह करा. ...

My Tip:

तांदुळ परतून वरून गरम पाणी घातल्या वर भात मोकळा होतो..

Reviews for Masala Rice Recipe in Marathi (0)