मुख्यपृष्ठ / पाककृती / मसाले भात

Photo of Masala Rice by Bharti Kharote at BetterButter
0
2
0(0)
0

मसाले भात

Aug-22-2018
Bharti Kharote
5 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मसाले भात कृती बद्दल

लग्न कार्यात मसाले भात ही अतिशय लोकप्रिय अशी पाककृती आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • प्रेशर कूक
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. 2 फुलपाञ बासमती तांदुळ
  2. एका कांद्याचे काप
  3. एका बटाट्याचे काप
  4. अर्धी वाटी ओल्या नारळाचे काप
  5. 2 मोठे चमचे शेंगदाणे
  6. 4/5 लवंगा
  7. 4/5 काळी मीरे
  8. 2 वेलदोडे
  9. अर्धी वाटी हिरवे मटार
  10. एक चमचा जीरे
  11. अर्धा चमचा शहाजीरे
  12. तीन तमाल पत्र
  13. जेष्ठ मधाची काडी अर्धा ईंच
  14. एक चमचा मोहरी
  15. 4/5 पाकळ्या लसूण
  16. दोन चमचे लाल तिखट
  17. एक चमचा गरम मसाला
  18. अर्धा चमचा हळद
  19. पाव चमचा हिंग
  20. चवीनुसार मीठ
  21. आवश्यकतेनुसार पाणि
  22. फोडणी साठी तेल

सूचना

  1. गॅस वर कूकर ठेवा
  2. त्यात तेल टाकून तांदूळ सोडून बाकी सर्व फोडणी ला टाका..
  3. तेलात हे सर्व जिन्नस चांगले परतून घ्या. .
  4. त्यात लाल तिखट गरम मसाला हळद हिंग मीठ घालून 5 मी.शिजू दया. .
  5. तोपर्यंत तांदुळ स्वच्छ धूऊन घ्या. .
  6. दुसर्या गॅस वर एका पातेल्यात एक ग्लास पाणी गरम करायला ठेवा. .
  7. आता कूकर मध्ये तांदुळ घालून सर्व जिन्नस एकञ परतून घ्या. .
  8. सर्व नीट हलवून घ्या..
  9. आता गरम पाणी त्यात घाला. .
  10. चांगल हलवून घ्या. .
  11. कूकर ला झाकण लावून तीन शिट्ट्या करून घ्या. .
  12. 5 मी.नी झाकण काढून घ्या. .
  13. आता कोथिंबीर घालून डीश मध्ये सर्व्ह करा. ...

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर