कोकोनट नानकटाई | Coconut Nankhatai Recipe in Marathi

प्रेषक Sanika SN  |  23rd Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Coconut Nankhatai recipe in Marathi,कोकोनट नानकटाई, Sanika SN
कोकोनट नानकटाईby Sanika SN
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  6

  माणसांसाठी

9

0

कोकोनट नानकटाई recipe

कोकोनट नानकटाई बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Coconut Nankhatai Recipe in Marathi )

 • २५० ग्राम मैदा
 • २०० ग्राम अनसॉल्टेड बटर किंवा तूप १७५ ग्राम साखर
 • १७५ ग्राम साखर
 • ५० ग्राम रवा
 • ५० ग्राम बेसन
 • ५० ग्राम डेसीकेटेड कोकोनट
 • दीड टीस्पून वेलचीपूड
 • २ टेस्पून पिस्तापूड

कोकोनट नानकटाई | How to make Coconut Nankhatai Recipe in Marathi

 1. ओव्हन २०० डीग्री सेल्शियसवर प्री-हीट करायला ठेवा.
 2. मिक्सिंग बाऊलमध्ये साखर व तुप एकत्र करुन फेटून घ्या.
 3. त्यात बेसन, रवा व डेसीकेटेड कोकोनट घालून लो स्पीडवर फेटून घ्या.
 4. आता त्यात थोडा-थोडा करुन, चाळलेला मैदा घालून मिक्स करुन घ्या.
 5. वेलचीपूड व पिस्तापूड घालून एकत्र मिक्स करा.
 6. बेकिंग ट्रेवर बेकिंग पेपर लावून घ्या
 7. तयार मिश्रणाचे छोटे, पेढ्याएवढे गोळे घेऊन, वळून हलके चपटे करा.
 8. बेकिंग ट्रेवर सर्व गोळे रचून ठेवा.
 9. त्यावर मधो-मध पिस्त्याचे काप किंवा पुड लावून घ्या.
 10. ओव्हनमध्ये २०० डीग्री सेल्शियसवर १० ते १२ मिनिटे बेक करुन घ्या.
 11. बेक झाल्यावर १० मिनिटांनी ट्रेमधून कुलिंग रॅकवर काढून ठेवा
 12. नानकटाई पूर्ण गार झाल्यावर हवाबंद डब्यात भरुन ठेवा.
 13. मस्तं पावसाळी वातावरणात गरमा-गरम चहासोबत ह्याचा आस्वाद घ्या.

My Tip:

खोबर्‍याचा स्वाद अजून येण्यासाठी ह्यात कोकोनट एसेन्सचा वापर तसेच तुपाऐवजी तुम्ही कोकोनट बटरचा वापर ही करु शकता.

Reviews for Coconut Nankhatai Recipe in Marathi (0)