कोकोनट कुकिज | Coconut Cookies Recipe in Marathi

प्रेषक Sanika SN  |  23rd Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Coconut Cookies recipe in Marathi,कोकोनट कुकिज, Sanika SN
कोकोनट कुकिजby Sanika SN
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  59

  मि.
 • किती जणांसाठी

  6

  माणसांसाठी

3

0

कोकोनट कुकिज recipe

कोकोनट कुकिज बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Coconut Cookies Recipe in Marathi )

 • १५० ग्राम बटर (रुम टेंपरेचरला असलेले)
 • १५० ग्राम पिठीसाखर
 • १ अंडे
 • १ वाटी मैदा
 • १ वाटी डेसीकेटेड कोकोनट

कोकोनट कुकिज | How to make Coconut Cookies Recipe in Marathi

 1. मिक्सींग बाऊलमध्ये बटर व पिठीसाखर एकत्र करून इल्केट्रीक बीटरने हलके होईपर्यंत फेटावे.
 2. त्यात एक अंडे फोडून पुन्हा फेटून घ्यावे.
 3. आतात त्यात मैदा व डेसीकेटेड कोकोनट हळू-हळू घालून मिश्रण स्लो स्पीडवर बीट करा.
 4. मऊसर पिठाचा गोळा तयार झाला की त्याला क्लिंग फिल्ममध्ये कव्हर करुन फ्रिजमध्ये १/२ तास ठेवावे.
 5. ओव्हन १५० डिग्रीवर प्री-हीट करुन घ्या.
 6. बेकिंग ट्रेवर बेकिंग पेपर किंवा व्हॅक्स पेपर लावून घ्या.
 7. सेट झालेल्या पिठाचे छोटे छोटे गोळे करुन घ्या व बेकिंग ट्रेवर अंतरावर लावा.
 8. १५० डिग्रीवर १५-२० मिनिटे कुकिज हलक्या-सोनेरी रंगावर बेक करुन घ्या.
 9. बेक झालेल्या कुकिज कुलिंग रॅकवर थोड्यावेळ थंड होण्यासाठी काढून ठेवाव्यात.
 10. पूर्ण गार झाल्या की हवाबंद डब्यात भरुन ठेवा.
 11. दूध,चहा,कॉफीबरोबर सर्व्ह करा.

Reviews for Coconut Cookies Recipe in Marathi (0)