आळूवडी | Taro leaf rolls Recipe in Marathi

प्रेषक Suchita Wadekar  |  26th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Taro leaf rolls recipe in Marathi,आळूवडी, Suchita Wadekar
आळूवडीby Suchita Wadekar
 • तयारी साठी वेळ

  20

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

आळूवडी recipe

आळूवडी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Taro leaf rolls Recipe in Marathi )

 • ● अळूच्या 2 गड्ड्या (10 पाने)
 • ● बेसनपीठ 2 वाट्या
 • ● लिंबा एवढी चिंच
 • ● गुळ लिंबाएवढा
 • ● हिरव्या मिरच्या 4-5 (तिखट)
 • ● लसूण पाकळ्या 4-5
 • ● जिरे 1 चमचा
 • ● हिंग, हळद प्रत्येकी अर्धा चमचा
 • ● मीठ आवश्यकतेनुसार

आळूवडी | How to make Taro leaf rolls Recipe in Marathi

 1. 1. प्रथम थोड्याशा पाण्यात चिंच भिजत घालावी.
 2. 2. आळूची पाने स्वच्छ धुऊन पोळपाटावर लाटण्याने लाटून घ्यावीत.
 3. 3. जिरे, लसून, हिरव्या मिरचिचे मिक्सरवर वाटण करून घ्यावे.
 4. 4. चिंच भिजली की तिचा कोळ काढून घ्यावा.
 5. 5. त्यात बारीक केलेला गुळ घालून हिरवी मिरचीचे वाटण घालावे.
 6. 6. हिंग, हळद, मीठ घालून त्या पाण्यात बसेल एवढे बेसनपीठ घालावे.
 7. 7. लाटण्याने लाटून ठेवलेले एक अळूचे पान घेऊन त्याला बेसनपीठाचे तयार केलेले पीठ लावावे.
 8. 8. त्यावर दुसरे पान ठेऊन त्यालाही पीठ लावावे.
 9. 9.अशाप्रकारे 3 ते 4 पाने एकावर एक ठेऊन त्याची वळकटी (रोल) करावी.
 10. 10. आणि तीळ लावून तेल लावलेल्या चाळणीत ठेऊन 20 मिनिटे वाफ द्यावी.
 11. 11. वाफवल्यानंतर त्याच्या एकसारख्या वड्या करून तेलात खरपूस तळून घ्याव्यात.
 12. आपली आळूवडी तैयार !

My Tip:

काहीवेळा ही आळूवडी खाल्यावर घशात एक विचित्र खवखव होते, ती होऊ नये यासाठी चिंच-गुळ वापरावा.

Reviews for Taro leaf rolls Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo

ह्या सारख्या दुसऱ्या पाककृती