मुख्यपृष्ठ / पाककृती / स्पायसी मोदक

Photo of Spicy Modak by Vaishali Joshi at BetterButter
826
3
0.0(0)
0

स्पायसी मोदक

Aug-29-2018
Vaishali Joshi
0 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

स्पायसी मोदक कृती बद्दल

तिखट मोदक प्रकार

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • अकंपनीमेंट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. मोदक पीठ १ कप
  2. तेल
  3. मीठ
  4. खवलेला नारळ १/४ कप
  5. शेंगदाणे कूट १ चमचा
  6. कांदा १ छोटा
  7. हिरवी मिर्ची१
  8. तिखट १/२ चमचा
  9. गरम मसला १ चमचा
  10. धणे पावडर १/२ चमचा
  11. हळद१/४ चमचा
  12. आमचूर १/२ चमचा
  13. साखर १ चमचा
  14. जीरे पावडर १/२ चमचा
  15. किसमिस २ चमचे
  16. कोथिंबीर
  17. साजुक तूप

सूचना

  1. मोदक पीठ तेल आणि मीठ टाकून मिक्स करा आणि पाण्याने थोड घट्ट बैटर भिजवून घ्या . शिटी न लावता कुकर मध्ये एक भांडयात ठेवून २० मिनिट वाफवून उकड काढून घ्या
  2. कढईत १ चमचा तेल घालून त्यावर कांदा परतून घ्या , मिर्ची आणि किसमिस घालून परतून घ्या ,त्यात आता सर्व मसाले म्हणजे - शेंगदाणे कूट , तिखट , हळद , धणे जीरे पावडर , गरम मसाला , मीठ , आमचूर घालून परतून घ्या .थोडा पाण्य़ा चा हबका मारा सगळ मिळून येण्य़ा साठी . मग त्यात खवलेला नारळ ,साखर आणि कोथिंबीर घाला मिक्स करून घ्या . हे सारण बाजूला ठेवा
  3. पिठाचे समान गोळे करून घ्या . एक एक गोळा घेवुन पारी लाटून घ्या त्यात सारण भरून मोदक करून घ्या . सगळे मोदक करुन घ्या आणि मोदक पात्रात १० मिनिट वाफवून घ्या
  4. सर्व्हिंग प्लेट मध्ये काढून साजुक तूप घालून खायला द्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर