मुख्यपृष्ठ / पाककृती / "गुळ - शेंगदाणा - खजूर" चे पौष्टीक लाडू

Photo of Jaggery - Peanuts - Date(Khajur) Ladu by SUCHITA WADEKAR at BetterButter
1670
1
0.0(0)
0

"गुळ - शेंगदाणा - खजूर" चे पौष्टीक लाडू

Aug-30-2018
SUCHITA WADEKAR
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

"गुळ - शेंगदाणा - खजूर" चे पौष्टीक लाडू कृती बद्दल

गुळ-शेंगदाणे मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी लाभदायक आहेत. गुळ-शेंगदाण्यात प्रथिने आणि कैल्शियम असल्यामुळे दात आणि हाडे मजबूत होतात. गुळ-शेंगदाणे खाल्याने हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते. गुळामुळे पोटात गॅस होणे, अपचन होणे या समस्यांना दूर ठेवले जाते त्यामुळे जेवण केल्यानंतर रोज गुळाचा एक खडा जरूर खावा. खजुरामध्ये लोहाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्याने हिमोग्लोबिनची कमतरता भरुन काढण्यास मदत होते. खजुरात कॅल्शियमही जास्त प्रमाणात असल्याने हाडे मजबूत होण्यास मदत होते.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 10

  1. ● १/२ किलो शेंगदाणे
  2. ● पाव किलो काळा खजूर
  3. ● पाव किलो गुळ

सूचना

  1. 1. प्रथम शेंगदाणे भाजून त्याची साले काढून त्याचा कूट करून घ्यावा.
  2. 2. खजूर पाच मिनिटे पाण्यात घालून ठेवावेत.
  3. 3. पाच मिनिटानंतर खजूरातील बिया कडून खजूर स्वच्छ धुऊन घ्यावेत आणि मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक करावे.
  4. 4. गुळ विळीवर बारीक करून घ्यावा.
  5. 5. यानंतर हे सर्व साहित्य एकत्र करावे आणि फूडप्रोसेसर मध्ये चांगले मिक्स करून घ्यावे.
  6. 6. यानंतर या मिश्रणाचे लाडू वळावेत आवश्यकता लागली तर लाडू वळताना थोडे तूप घालावे.  
  7. 7. आपले झटपट "गुळ, शेंगदाणा आणि खजुराचे पौष्टीक लाडू" तैयार !

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर