मुख्यपृष्ठ / पाककृती / नारळ सुकी भेंडी फ्राय

Photo of Okra fry with coconut by Anil Pharande at BetterButter
396
1
0.0(0)
0

नारळ सुकी भेंडी फ्राय

Aug-31-2018
Anil Pharande
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

नारळ सुकी भेंडी फ्राय कृती बद्दल

साधी सोपी भेंडी फ्राय रेसिपी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • इंडियन
  • स्टर फ्रायिंग
  • फ्रायिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. ओला नारळ खोवलेला 1/2 कप
  2. भेंडी चिरून 250 ग्राम्स
  3. लाल सुक्या बेडगी मिरच्या 3
  4. लिंबाएवढ्या चिंचेचा कोळ
  5. गुळ 1 चमचा
  6. मीठ चवीप्रमाणे
  7. फोडणीसाठी :
  8. तेल 1 टेबलस्पून
  9. मोहरी 1 टीस्पून
  10. उडीद डाळ 1/2 चमचा
  11. बेडगी सुक्या लाल मिरच्या 2
  12. कढीलिंब 8 ते 10 पाने

सूचना

  1. कढईमध्ये तेल गरम करणे
  2. त्यात मोहरी घालणे,
  3. मोहरी तडतडल्यानंतर त्यात उडीद डाळ घालणे व सोनेरी रंगावर तळून घेणे
  4. कढीपत्ता घालणे व आख्या 2 सुक्या लाल मिरच्या घालणे व अर्धा मिनिट परतणे
  5. चिरलेली भेंडी घालणे व मोठ्या आचेवर भेंडी अर्धी शिजेपर्यंत सतत परतत राहणे
  6. मिक्सरमध्ये ओले खोबरे व 3 सुक्या लाल मिरच्या पाणी न घालता जाडसर वाटून घेणे
  7. भेंडी अर्धी शिजल्यावर त्यात गूळ घालणे व चिंचेचा कोळ घालणे व झाकण ठेवून पाणी आटेपर्यंत भेंडी शिजवून घेणे, थोडासा पाण्याचा हबका मारणे
  8. त्यात मिर्चीसह वाटलेला नारळ घालणे व बारीक गॅसवर 5 मिनिटे परतत राहणे
  9. गरमगरम वरण भातासोबत वाढणे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर