Photo of Modak blossom by Manisha Sanjay at BetterButter
1143
9
0.0(3)
0

Modak blossom

Sep-01-2018
Manisha Sanjay
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • डिनर पार्टी
  • फ्युजन
  • स्टीमिंग
  • डेजर्ट
  • ग्लुटेन फ्री

साहित्य सर्विंग: 4

  1. तांदूळ पीठ - १ वाटी
  2. दूध - १ /२ वाटी
  3. पाणी - १ /२ वाटी
  4. मीठ - १ /२ टीस्पून
  5. साखर - १ टेबलस्पून
  6. तेल - १ /२ टीस्पून
  7. खायचा लाल रंग - १ /८ टीस्पून पेक्षा कमी
  8. किसलेले ओले खोबरे - १ वाटी
  9. गुळ - १ वाटी
  10. तूप - १ टीस्पून
  11. वेलची पावडर - १ /४ टीस्पून

सूचना

  1. झाड बुडाच्या पातेल्यात पाणी, दूध, साखर आणि तेल उकळायला ठेवा.
  2. उकळी आली की तांदूळ पीठ, मीठ घालून मिक्स करा. झाकण ठेवून वाफ येऊ द्या.
  3. वाफ आली की गॅस बंद करावा.
  4. कढई मध्ये खोबरे, तूप आणि गुळ मिक्स करून घ्या.
  5. मध्यम आचेवर मिश्रण घट्ट होई पर्यंत हालवत रहा.
  6. घट्ट झाले की वेलची पावडर घाला आणि गॅस बंद करा.
  7. उकड ताटात काढुन गार होऊ द्या.
  8. पाण्याच्या हात लावून चांगली मळून घ्या.
  9. दोन भाग करून एकात लाल रंग मिक्स करा.
  10. नंतर पोळपाटावर पोळी लाटून छोट्या वाटी ने गोल कापून घ्या.
  11. ३ पांढरे आणि २ लाल गोल घेऊन एका खाली एक लाऊन घ्या.
  12. त्याला मधुन कट द्या.
  13. नारळाचे सारण भरून रोल करून घ्या.
  14. खालच्या बाजुने बंद करून घ्या.
  15. हळदी च्या पानात किंवा असेच फुले १०/१५ मिनिटे वाफवून घ्या

रिव्यूज (3)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Bharti Kharote
Sep-02-2018
Bharti Kharote   Sep-02-2018

Very nice

Deepa Gad
Sep-02-2018
Deepa Gad   Sep-02-2018

मस्तच

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर