मुख्यपृष्ठ / पाककृती / कोकोनट कोफ्ता करी

Photo of Cocount kofta curry by Rohini Rathi at BetterButter
1153
5
0.0(0)
0

कोकोनट कोफ्ता करी

Sep-02-2018
Rohini Rathi
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कोकोनट कोफ्ता करी कृती बद्दल

दरवेळी भाजीला काय करावे हा प्रत्येक गृहिणीचा प्रश्न असतो जर घरात भाजी शिल्लक नसेल तर अशा वेळी बनवण्यात झटपट व खाण्यास स्वादिष्ट कोकनट कोफ्ता करी हा एक उत्तम पर्याय आहे

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • फ्रायिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. कोफ्ते बनवण्यासाठी
  2. किसलेला ओला नारळ अर्धा कप
  3. शेंगदाण्याचा कूट दोन चमचे
  4. बेसन पीठ दोन चमचे
  5. लाल मिरची पावडर अर्धा टी स्पून
  6. हळदी चिमटीभर
  7. धने पूड अर्धा चमचा
  8. खसखस एक टीस्पून
  9. मीठ चवीनुसार
  10. तेल कोफ्ते तळण्यासाठी
  11. कॉर्नफ्लोअर पावडर एक चमचा
  12. ग्रेव्हीसाठी
  13. कांदे दोन
  14. टोमॅटो दोन
  15. लसणाच्या पाकळ्या चार ते पाच
  16. तेल दोन टेबल स्पून
  17. मोहरी अर्धा चमचा फोडणीसाठी
  18. हिंग पाव चमचा
  19. लाल मिरची एक टिस्पून
  20. गरम मसाला एक टी स्पून
  21. हळदी पावडर पाव टी स्पून
  22. किसलेले खोबरे दोन चमचे
  23. मीठ चवीनुसार
  24. पाणी आवश्यकतेनुसार

सूचना

  1. कोफ्ते बनवण्यासाठी
  2. किसलेला ओला नारळ शेंगदाण्याचा कूट बेसन पीठ खसखस मीठ लाल मिरची पावडर हळद एकत्र करून पिठाचा गोळा बनवून घ्यावा
  3. नंतर तयार पिठाचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यावे
  4. कढईत तेल गरम करून घ्यावे
  5. एक चमचा कॉर्नफ्लोअर पावडर मध्ये दोन चमचे पाणी मिसळून बेटर बनवून घ्यावे
  6. तयार बॅटरमध्ये कोफ्ते घोळून घ्यावे
  7. गरम तेलात तळलेले कोफ्ते मंद आचेवर तळून घ्यावे
  8. अशाप्रकारे सर्व कोफ्ते तळून घ्यावे
  9. ग्रेव्ही बनवण्यासाठी कढईत तेल गरम करून मोहोरी व हिंगाची फोडणी घालून घ्यावी
  10. कांदा व टोमॅटो ची प्युरी बनवून घ्यावी
  11. लसणाची पेस्ट कांदा-टोमॅटोची प्युरी तेलात परतून घ्यावी
  12. नंतर त्यात दोन चमचे खोबरे घालून घ्यावे
  13. लाल मिरची पावडर हळदी पावडर गरम मसाला व आवश्यकतेनुसार पाणी घालून ग्रेव्ही उकळून घ्यावी
  14. चवीनुसार मीठ व बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यावी
  15. नंतर कोफ्ते घालून ग्रेवी एकजीव करून घ्यावी
  16. अशाप्रकारे तयार कोकणात कॉफ्टा करी पोळी व भाताबरोबर गरमागरम सर्व्ह करावी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर