Photo of Fansachi biryani by Prashant Jagtap at BetterButter
1607
2
0.0(1)
0

Fansachi biryani

Sep-03-2018
Prashant Jagtap
20 मिनिटे
तयारीची वेळ
40 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • मध्यम
  • डिनर पार्टी
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. १/२ किलो फणस
  2. १/२ किलो बासमती तांदूळ
  3. १ पाव घट्ट दही
  4. ३ मोठी वेलची
  5. ५ लवंग
  6. ५ मिरी
  7. ५ लहान वेलची
  8. २ काड्या कलमी
  9. २ कर्णफुले
  10. १ चमचा खसखस
  11. १/२ चमचा जायपत्री
  12. १ चमचा कसुरी मेथी
  13. २चमचे गरम मसाला
  14. २ चमचा लाल तिखट
  15. १/२ चमचा हळद
  16. १/२ चमचा जिरे
  17. ३ तमालपत्र
  18. मीठ चवीप्रमाणे
  19. १ पळी तेल
  20. १ पळी साजुक तूप
  21. ५ पाकळ्या लसूण
  22. ३ हिरव्या मिरच्या
  23. सजावटीसाठी कोथिंबीर

सूचना

  1. फणसाच्या फोडी ५ मिनिटे वाफवून घ्या
  2. एका भांड्यात दही घेऊन त्यात तेल तूप आणि तांदूळ सोडून दिलेले मसाले दह्यात घालून चांगले हाताने मिक्स करावे
  3. आता ह्या मिश्रणात वाफवून घेतलेल्या फणसाच्या फोडी घालून चांगले १५ मिनिटे मेरिनेट करिता झाकून ठेवावे
  4. तांदूळ स्वच्छ धुवून उकळी आलेल्या पाण्यात थोडे मीठ घालून तांदूळ अर्धा शिजवून घ्या. चाळणीत हा तांदूळ काढून पाणी निथळून घ्या
  5. कुकर वा जाड बुडाच्या पातेल्यात तेल आणि साजुक तूप गरम करून त्यात मोहरी हिंग तडतडल्यावर फणसाचे मेरीनेट मिश्रण टाकून हलक्या हाताने ढवळावे. फक्त ५मिनीट ढवळल्यावर अर्धा शिजवून घेतलेला तांदूळ टाकून हलक्या हाताने एकसारखे करावे. मिक्स करुन नये ढवळू पण नये.
  6. वर झाकण ठेवून वाफ आणावी १० मिनिटे मंद आचेवर शिजू द्यावे आणि नंतर ५ मिनिटे अगदी मंद आचेवर शिजू द्यावे. नंतर गेस बंद करावा
  7. आणि गरमागरम फणसाची बिर्याणी बारीक चिरलेला कोथिंबीर पेरून. सर्व्ह करा.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Poonam Kothari
Sep-04-2018
Poonam Kothari   Sep-04-2018

प्रशांत बिर्याणीचा फोटो अपलोड करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर