मुख्यपृष्ठ / पाककृती / Kothimbir Vadi

Photo of Kothimbir Vadi by Sunita Sahu at BetterButter
1
4
3(2)
0

Kothimbir Vadi

Sep-05-2018
Sunita Sahu
30 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • किटी पार्टी
 • महाराष्ट्र
 • स्टीमिंग
 • फ्रायिंग
 • स्नॅक्स
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

 1. १जुडी कोथिंबीर
 2. १कप बेसन
 3. १/४ कप तांदळाचे पीठ
 4. ४ हिरवी मिरची
 5. १ लसूण
 6. १चमचा जिरे
 7. १चमचा हळद
 8. १/२ चमचा लाल मिरची पावडर
 9. मीठ चवीनुसार
 10. तळण्यासाठी तेल
 11. १ टेबलस्पून तीळ

सूचना

 1. कोथिंबीर एक जुडी घ्यावी.व्यवस्थित साफ करुन बारिक चिरुन पाण्यातुन दोन ते तीन वेळा स्वच्छ धुऊन घ्यावी.
 2. त्यानंतर कोणत्याही सुती कापड्यावर पंख्याखाली पसरुन ठेवा.
 3. त्यामध्ये पाणी अजिबात राहायला नको.
 4. आता साहित्य काय लागेल ते पाहुया.एक जुडी कोथिंबीर साठी एक कप बेसन, पाव कप तांदळाचे पीठ घ्यावे.तांदळाच्या पीठामुळे वडीला कुरकुरीत पणा येतो.
 5. त्यानंतर त्यात हिरवी मिरची, लसूण यांची बारीक पेस्ट करून घ्यावी.
 6. एक चमचा जिरे, एक चमचा हळद, अर्धा चमचा लाल मिरची पावडर,मीठ चवीनुसार घ्यावं.आता कोथिंबीर मध्ये वरील जिन्नस टाकून पीठ चांगले मिसळून त्यात दोन ते तीन चमचे पाणी टाकून पीठ व्यवस्थितपणे मळुन घ्यावे.
 7. जास्त पाणी टाकू नये.कोथिंबीर मध्ये मीठ असल्याने त्याला नंतर पाणी सुटते
 8. पीठ पातळ होईल वडी कुरकुरीत होणार नाहीत.त्यात थोडे तेल घालून पीठ व्यवस्थितपणे मळुन घ्यावे.
 9. तेल घातल्याने पीठ हाताला चिकटणार नाही.
 10. नंतर त्याचे रोल्स करून ते वाफवण्यासाठी एक चाळण घ्यावी त्या चाळणीला तेल लावून घ्यावे त्यामुळे ते चाळीला चिकटणार नाहीत.नंतर कढईत पाणी गरम करून त्यावर हि चाळण झाकून १५ मिनिटांसाठी वाफवायला ठेवावी
 11. १५ मिनिटांनी झाकण काढून थंड होण्यासाठी ठेवावे.
 12. थंड झाल्यावर त्याचे काप करावेत.एका कढईत तेल गरम करून मध्यम आचेवर वड्या चांगला सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यावेत.
 13. त्यानंतर प्लेट मध्ये टिश्यू पेपर पसरुन वड्या काढून घ्याव्यात असं केल्याने जास्तीचे तेल निघून जाईल.
 14. यामध्ये लाल मिरची पावडर टाकल्याने त्याचा रंग लालसर होईल तुम्ही फक्त लसूण मिरची पेस्ट टाकू शकता.हि वडी इतकी चविष्ट लागते ती अशी खाल्ली तरीही खुप छान लागते.
 15. मी येथे शेंगदाण्याची चटणी बरोबर सर्व्ह केली आहे.तुम्ही टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करु शकता.

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Varsha Pahade
Dec-19-2018
Varsha Pahade   Dec-19-2018

उत्त्तम ्

Vidya Gurav
Sep-16-2018
Vidya Gurav   Sep-16-2018

खूपच सुंदर

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर