मुख्यपृष्ठ / पाककृती / उकडीचे मोदक

Photo of UKADICHE MODAK by Runa Ganguly at BetterButter
0
2
0(0)
0

उकडीचे मोदक

Sep-07-2018
Runa Ganguly
20 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उकडीचे मोदक कृती बद्दल

गणेश चथुर्थी किंवा अन्य विशेष उत्सावेत महाराष्ट्राचे अद्वितीय हे मिष्टान्न

रेसपी टैग

 • व्हेज
 • मध्यम
 • फेस्टिव
 • महाराष्ट्र
 • ब्लेंडींग
 • स्टीमिंग
 • सौटेइंग
 • डेजर्ट
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 10

 1. २ कप पाणी
 2. २ कप तांदुराचे पीठ
 3. २ कप ओले खोबरं
 4. १/२ कप गूळ
 5. १ टीस्पून वेलची पावडर
 6. १ टीस्पून तेल किंवा तूप
 7. गरज प्रमाणे मीठ

सूचना

 1. सारण बनवण्यासाठी नारळ खवून घ्यावा. प्रमाणासाठी एक स्टीलची वाटी घ्यावी.( जितकया वाट्या खवलेला नारळ असेल त्याच्या निमपट किसलेला गूळ घ्यावा. )
 2. पातेल्यात खवलेला नारळ आणि गूळ एकत्र करून मंद आचेवर ढवळत राहावे
 3. गूळ वितळला कि वेलची पूड, कुटलेले बदाम व काजू घालावी. ढवळून बाजूला ठेवून द्यावे.
 4. जाड पातेल्यात २ कप पाणी उकळवत ठेवावे. त्यात १ चमचा तेल किंवा तूप घालावे
 5. चवीसाठी थोडे मिठ घालावे
 6. गॅस बारीक करून पिठ घालावे
 7. कालथ्याच्या मागच्या दांडीने ढवळावे
 8.  मध्यम आचेवर २-३ मिनीटे वरती झाकण ठेवून वाफ काढावी
 9. गॅसवरून उतरवून ५ मिनीटे झाकून ठेवावे.
 10. परातीत तयार उकड काढून घ्यावी
 11. उकड मळताना तेल आणि थोडे पाणी लावून मऊसर मळून घ्यावी.
 12. उकड व्यवस्थित मळून झाली कि त्याचे सुपारीपेक्षा थोडे मोठे गोळे करून त्याची पारी तयार करावी
 13. त्यात एक चमचाभर सारण भरून बोटाने पारीच्या चुण्या कराव्यात आणि सर्व चुण्या एकत्र आणून मोदक बंद करावा.
 14. जर मोदकपात्र उपलब्ध असेल तर पात्रात पाणी उकळत ठेवावे 
 15. त्यातील चाळणीत स्वच्छ धुतलेले सुती कापड ठेवून किंवा प्लास्टीकची जाड शिट ठेवून त्यावर मोदक ठेवावेत
 16.  वरून झाकण लावून १०-१२ मिनीटे वाफ काढावी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर