मुख्यपृष्ठ / पाककृती / पुणेरी मिसळ

Photo of PUNERI MISAL by Runa Ganguly at BetterButter
1093
2
0.0(0)
0

पुणेरी मिसळ

Sep-08-2018
Runa Ganguly
20 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पुणेरी मिसळ कृती बद्दल

पूणे राज्यातील हा मिसळ, पुर्ण देशात प्रसिद्घ आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • किटी पार्टी
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • बॉइलिंग
  • सौटेइंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. मोड आलेली मटकी २ वाट्या
  2. बटाटा १
  3. आले लसूण पेस्ट १ चमचा  
  4. जाडे पोहे भिजवलेले १ वाटी
  5. तेल आवश्यकतेनुसार
  6. मोहरी अर्धा चमचा
  7. जिरे अर्धा चमचा
  8. लिंबू १
  9. कांदे ३  
  10. टमाटर १
  11. तयार फरसाण १ वाटी
  12. सुक्या खोबऱ्याचा कीस पाव वाटी
  13. तिखट चवीनुसार
  14. मीठ चवीनुसार
  15. गरम मसाला पाव चमचा
  16. कोथिंबीर अर्धी वाटी
  17. हळद पाव चमचा
  18. पाणी आवश्यकतेनुसार

सूचना

  1. प्रथम पोहे बनवण्यासाठी एका कढईत २ चमचे तेल घेऊन त्यात पाव चमचा मोहरी व जिरे तडतडू द्यावे
  2. थोडी हळद टाकावी. पोहे व मीठ घालून ढवळून २ मिनिटाने गॅस बंद करून खाली उतरवून घ्यावे
  3. मटकीची उसळ बनवण्यासाठी एका भांड्यात मटकी व ६ कप पाणी घेऊन १० मिनिटे उकळावे.
  4. मटकी दाबून पहावी. शिजली असल्यास मग त्याचे पाणी काढून बाजूला ठेवावे.
  5. एका पातेल्यात ३ चमचे तेल घेऊन त्यात पाव चमचा मोहरी व जिरे तडतडू द्यावे
  6. मग १ कांदा बारीक चिरून टाकावा.
  7. कांदा शिजल्यावर थोडीशी हळद, अर्धा चमचा आले-लसूण पेस्ट टाकून थोडेसे परतावे.
  8. आता टमाटर टाकून,तिखट टाकावे
  9. २ मिनिटे परतावे. मोड आलेली मटकी, मीठ टाकून त्यात उकडलेला बटाटा अर्धवट कुस्करून टाकावा.
  10. उसळ पूर्ण कोरडी होऊ द्यावी. 
  11. कट (तिखट रस्सा) बनवण्यासाठी प्रथम एक कांदा चिरून घ्यावा
  12. तव्यावर अर्धा चमचा तेल टाकून त्यावर खरपूस परतावा. 
  13. तव्यावर खोबऱ्याचा कीस भाजून घ्यावा. 
  14. खोबरे व कांदा एकत्र करून मिक्सर मध्ये थोडे पाणी टाकून वाटून घ्यावे.
  15. आता एका भांड्यात ७-८ चमचे तेल घ्यावे
  16. त्यात वाटलेले मिश्रण, अर्धा चमचा आले-लसूण पेस्ट, तिखट, थोडीशी हळद, गरम मसाला टाकून बारीक गॅस वर ५ मिनिटे परतत राहावे.
  17. मग त्यात मटकी शिजवलेले पाणी टाकून कट पातळ करून घ्यावा. हवे असल्यास अजून पाणी टाकून पातळ करावे.
  18. सर्व्ह करताना एका बाऊल मध्ये प्रथम पोहे, त्यावर उसळ, मग कट, बारीक चिरलेला कांदा, फरसाण, व कोथिंबीर असे सर्व्ह करतात.
  19. हवे असल्यास कट अजून एका बाऊल मध्ये बाजूला द्यावा. सोबत पाव व लिंबू चिरून द्यावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर