BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / बटाट्याचे भुजणे

Photo of BATATACHE BHUJNE by Runa Ganguly at BetterButter
0
2
0(0)
0

बटाट्याचे भुजणे

Sep-08-2018
Runa Ganguly
8 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बटाट्याचे भुजणे कृती बद्दल

पाथरे प्रभू यांचा शैलीत बनवा हे बटाटेच्या भुजने

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 3

  1. ३ मध्यम बटाटे
  2. ४ मध्यम कांदे
  3. २ मोठे चमचे तेल
  4. पाऊण चमचा लाल तिखट
  5. अर्धा चमचा हळद
  6. ४ लसूण पाकळ्या किंवा अर्धा चमचा भाजून कुटलेली जिरेपूड
  7. एक‍अष्टमांश हिंग
  8. २ चमचे कोथिंबीर
  9. अर्धा वाटी ओले खोबरे (असल्यास)
  10. चवीनुसार मीठ

सूचना

  1. बटाटे दुवून सोलावे. 
  2. त्यांच्या गोल ३ मिली मीटर जाडीच्या काचऱ्या चिराव्या
  3. कांदे सोलून उभे पातळ चिरावे
  4. एका जाड बुडाच्या पातेल्यात कांदे घालावे
  5. त्यात तेल, तिखट, मीठ, हळद, हिंग घालावा. हलक्या हाताने एकत्र मिसळावे
  6. कांद्याच्या पाकळ्या सुट्या होऊन मसाला सारखा मिसळला की लसूणपाकळी जरा ठेचून घालावी
  7. लसूण न खाणारांनी जिरेपूड घालावी.
  8. त्यात बटाट्याच्या काचऱ्या घालाव्या
  9. अर्धी वाटी पाणी घालून भाजी अलगद ढवळावी व पातेली चुलीवर ठेवावी
  10. आंच मंद करून,वर पाण्याचे झाकण ठेवावे.
  11. भाजी शिजली की दुसऱ्या वाढायच्या भांड्यात काढावी. 
  12. ही भाजी ब्रेड, पोळी, पुरी किंवा भात याबरोबर चांगली लागते

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर