मुख्यपृष्ठ / पाककृती / Surli vadi

Photo of Surli vadi by Lata Lala at BetterButter
89
4
0.0(1)
0

Surli vadi

Sep-09-2018
Lata Lala
15 मिनिटे
तयारीची वेळ
7 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • व्हेज
 • मध्यम
 • किटी पार्टी
 • महाराष्ट्र
 • ब्लेंडींग
 • मायक्रोवेवींग
 • साईड डिश
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

 1. १ कप बेसन १
 2. कप आंबट ताक (जरा घट्ट)
 3. दिड ते पावणेदोन कप पाणी
 4. एक टिस्पून मिरचीचा ठेचा
 5. १/२ टिस्पून हळद
 6. १/२ टिस्पून हिंग फोडणीसाठी
 7. २ टेस्पून तेल,
 8. १/४ टिस्पून मोहोरी,
 9. २ ते ३ चिमटी हिंग
 10. खवलेला ताजा नारळ,
 11. गरजेनुसार वरून पेरायला थोडे लाल तिखट
 12. बारीक चिरलेली कोथिंबीर
 13. मीठ मिश्रण पसरवण्यासाठी कालथा
 14. लांब एलुमिनीयंम फॉईल

सूचना

 1. बेसन, ताक, पाणी एकत्र करावे. बेसनाच्या गुठळ्या न होता मिश्रण भिजवावे.
 2. त्यात मिरचीचा ठेचा, हळद आणि हिंग घालावे. चवीपुरते मीठ घालावे. सर्व मिश्रण मिक्सर ला एकदम स्मूद करून घ्यावे.
 3. मायक्रोवेवसेफ भांड्यात सर्व मिश्रण घालावे.
 4. हाय पॉवरवर ५० सेकंद मिश्रण शिजवावे.
 5. भांडे बाहेर काढून व्यवस्थित ढवळावे. किंचीत गुठळ्या होण्याची शक्यता असते तेव्हा एगबिटरने मिश्रण निट एकजीव करून घ्यावे.
 6. मिश्रण शिजेस्तोवर ३०-४० सेकंद मायक्रोवेव करत राहावे. साधारण २ ते ३ वेळा मिश्रण मायक्रोवेव करावे लागते.
 7. मिश्रण खुप दाट नाही आणि खुप पातळ नाही असे झाले कि मिश्रण शिजले असे समजावे.
 8. बेसनाचे हे मिश्रण शिजवण्यापुर्वी ओट्यावर किंवा टेबलावर एलुमिनीयंम फॉईल पसरवून ठेवावा.
 9. मिश्रण थंड होवू देवू नये. लगेच कालथ्याने मिश्रणाचा पातळ थर फॉईल वरती पसरावा. थोडे थंड होवू द्यावे.
 10. कढल्यात तेल गरम करावे त्यात मोहोरी, हिंग घालून फोडणी करावी. आणि मिश्रणाच्या पातळ थरावर चमच्याने फोडणी पसरावी. म्हणजे फोडणी नीट पसरली जाते.
 11. त्यावर खवलेला नारळ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर पेरावी
 12. थोडे लाल तिखट पेरावे. नंतर सुरीने ५ इंच पट्ट्या कापाव्यात. त्याची सुरळी (गुंडाळी)करावी आणि मग त्या सुरळीचे ३-४ भाग करावेत.
 13. सर्व्ह करताना सुरळीच्या वड्यांवर थोडी कोथिंबीर आणि खवलेला नारळ घालावा.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Vidya Gurav
Sep-16-2018
Vidya Gurav   Sep-16-2018

Nice

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर