मुख्यपृष्ठ / पाककृती / पंचखाद्याचे - खिरापतीचे मोदक

Photo of Panchakhadya / Khirapat Modak by Sanika SN at BetterButter
1141
2
0.0(0)
0

पंचखाद्याचे - खिरापतीचे मोदक

Sep-09-2018
Sanika SN
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पंचखाद्याचे - खिरापतीचे मोदक कृती बद्दल

बाप्पासाठी खास नैवेद्य.

रेसपी टैग

  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • डेजर्ट

साहित्य सर्विंग: 4

  1. १ वाटी सुके खोबरे
  2. १ टेस्पून खसखस
  3. १/२ वाटी खडीसाखर
  4. १ टेस्पून बेदाणे (किसमिस)
  5. १ टेस्पून खारीक बारीक तुकडे करुन
  6. १/२ टीस्पून वेलचीपूड
  7. १ वाटी मैदा
  8. १/२ वाटी रवा
  9. दूध मैदा भिजवण्यापुरते
  10. १/४ टीस्पून मीठ
  11. ३ टेस्पून तेलाचे मोहन

सूचना

  1. साहित्य
  2. साहित्य
  3. एका पॅनमध्ये सुक्या खोबर्‍याला मंद आचेवर हलक्या तांबूस रंगावर भाजून घ्यावे.
  4. बाजूला काढून ठेवावे व त्याच पॅनमध्ये खसखस हलकी भाजून घ्यावी. खडीसाखरेला खल-बत्त्यात थोडे कुटून घ्यावे.
  5. सुके खोबरे, खसखस गार झाले की एकत्र करावे, त्यात कुटलेली खडीसाखर मिसळून मिक्सरला बारीक फिरवून घ्यावे.
  6. ह्या मिश्रणात आता बेदाणे, खारकेचे तुकडे व वेलचीपूड घालून एकत्र करावे.
  7. एका भांड्यात रवा, मैदा व मीठ एकत्र करावे.
  8. त्यात कडकडित मोहन घालावे.
  9. चांगले मिक्स करावे, थोडे थोडे दुध घालून घट्ट पिठ मळून घ्यावे. तासभर झाकून ठेवावे.
  10. तासाभराने पीठ पुन्हा एकदा मळून घ्यावे व त्याचे छोटे-छोटे गोळे करावे.
  11. गोळ्याची छोटी पारी लाटून मुखर्‍या पाडून घ्याव्यात.
  12. त्यात चमचाभर सारण भरून, हलक्या हाताने मोदकाचे तोंड बंद करावे.
  13. अश्या प्रकार सर्व मोदक बनवून घ्यावे.
  14. कढईत तेल तापत ठेवावे, आच मंद असावी.
  15. एक-एक करुन तयार मोदक त्यात सोडावे व मंद आचेवर सोनेरी रंगावर तळावेत.
  16. छान खुसखुशीत होतात मोदक.
  17. पंचखाद्याचे - खिरापतीचे मोदक गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवून प्रसाद म्हणून सर्वांना द्यावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर