मुख्यपृष्ठ / पाककृती / उकडीचे मोदक(15)

Photo of UKADICHE Modak by Manjiri Hasabnis at BetterButter
724
1
0.0(0)
0

उकडीचे मोदक(15)

Sep-13-2018
Manjiri Hasabnis
25 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
8 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उकडीचे मोदक(15) कृती बद्दल

पारंपरिक डिश

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 8

  1. तांदळाची पिठी 1 बाउल
  2. 1 चमचा साजूक तूप
  3. 1 बाउल पाणी
  4. अर्धा चमचा मीठ
  5. सारण
  6. 1 नारळ खऊन त्याचे खोबरे
  7. 2 वाट्या गूळ
  8. 2 चमचे खसखस
  9. 1 चमचा वेलची पूड
  10. ड्रायफ्रूटस आवडी प्रमाणे

सूचना

  1. प्रथम एका कढईत खसखस भाजून घ्यावी खसखस लालसर झाल्यावर त्यात खोबरे,गूळ घालून परतावे चांगले मिक्स झाल्यावर मिश्रण थोडे आळून यायला लागले की गॅस बंद करावा नंतर त्यात ड्रायफ्रूटस वेलची पावडर घालून मिश्रण गार करायला ठेवावे नंतर एका जाड बुडाच्या पॅन मध्ये 1 बाउल पाणी घालून उकळवायला ठेवावे त्यात 1 चमचा तूप आणि मीठ घालावे मिश्रण उकळले की त्यात एक बाउल तांदूळ पिठी घालून मिक्स करून झाकण ठेवावे आणि गॅस बंद करावा 15/20 मिनिटाने उकड चांगली मळून घ्यावी (मी फूड प्रोसेसर मध्ये मळते गरज लागेल तसे 2 चमचे पाणी घालावे उकड चांगली मळून तयार झाली की त्यातून एक लिंबाएवढा गोळा घेऊन त्याची पारी बनवावी (मी पापड /पुरी बनवायचे मशीन असते त्यावर परी बनवून घेतली ) पारी मध्ये 1 मोठा चमचा सारण भरून पारीच्या सगळ्या बाजूने दोन बोटांच्या चिमटीने कळ्या पाडून घेऊन अलगद सगळ्या कळ्या एकत्र करून मस्त मोदक बनवणे असे सगळे मोदक झाले की त्याला 15 मिनिटे वाफवून घेणे वाफवायला ठेवताना प्रत्येक मोदकाचा तळ पाण्यात बुडवून मग ठेवावा सगळे मोदक तयार झाल्यावर मस्त बाप्पाला त्यावर साजूक तुपाची धार सोडून नेवेद्य दाखवावा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर