मुख्यपृष्ठ / पाककृती / दाल फ्राय तडका

Photo of DALFRY tadaka by Samiksha Mahadik at BetterButter
251
2
0.0(0)
0

दाल फ्राय तडका

Sep-15-2018
Samiksha Mahadik
0 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दाल फ्राय तडका कृती बद्दल

महाराष्ट्र

रेसपी टैग

  • महाराष्ट्र

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 वाटी तूरडाळ
  2. 1 कांदा बारीक चिरलेला
  3. 1 टोमॅटो बारीक चिरलेला
  4. आलं लसूण पेस्ट
  5. कोथिंबीर
  6. हळद
  7. तिखट
  8. मीठ
  9. धनेजिरे पूड
  10. साजुक तूप
  11. लाल सुक्या मिरच्या 3

सूचना

  1. प्रथम तूरडाळ धुवून 10 मिनिटे पाण्यात भिजवून ठेवा मग कुकरमध्ये हळद व मीठ घालून शिजवून घ्या
  2. मग एका पातेल्यात साजुक तूप गरम करून त्यात हिंग व जिरे घाला व परतून घ्या मग त्यात लाल सुक्या मिरच्या, आलं लसूण पेस्ट घालून परतून घ्यावे 2 मिनिटे मग त्यात कांदा घालून 5 मिनिटे परतावे कांदा गुलाबीसर झाल पाहिजे
  3. मग त्यात हळद, तिखट, धानेजिरे पूड घालून परतावे
  4. मग त्यात टोमॅटो व कोथींबीर घालून छान तूप सुटेपर्यंत परतून घ्या
  5. मग त्यात शिजलेली डाळ घाला
  6. डाळीला उकळी येऊ द्या तोपर्यंत तडका देण्यासाठी दुसऱ्या भांड्यात साजुक तूप गरम करा मग त्यात जिरे घाला व परता मग त्यात अर्धा चमचा तिखट व कोथिंबीर घालून परता व गॅस बंद करा
  7. हा तडका डाळीवर घाला व एक उकळी काढून गॅस बंद करा
  8. बाऊलमध्ये काढून कोथिंबीर व साजुक तूप घालून गरम गरम जीरा राईस किंवा प्लेन राईस बरोबर सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर