BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / पंचामृत

Photo of Panchamruta by Archana Lokhande at BetterButter
0
2
0(0)
0

पंचामृत

Sep-17-2018
Archana Lokhande
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पंचामृत कृती बद्दल

हा पदार्थ खासकरून आमच्याकडे गौरींच्या नैवेद्यसाठी केला.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • लोणचं / चटणी वगैरे
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 6

  1. चिंच १ वाटी
  2. गुळ १ ते १ १/४ वाटी(आवडीनुसार)
  3. शेंगदाणे १ वाटी
  4. पांढरे तीळ १/२ वाटी
  5. हिरव्या मिरच्या ६
  6. सुके खोबरे १ छोटी वाटी
  7. हिंग
  8. जिरे १ चमचा
  9. तेल १ चमचा
  10. मीठ चवीप्रमाणे
  11. पाणी

सूचना

  1. चिंच स्वच्छ करून गरम पाण्यात अर्धा तास भिजत ठेवली.
  2. शेंगदाणे आणि तीळ भाजून घेतले.
  3. अर्ध्या शेंगदाणाची साल काढून त्याचे दोन भाग करून घेतले.
  4. उरलेले शेंगदाणे आणि तीळ वेगवेगळे मिक्सरवर कुट करून घेतला.
  5. खोबर्याचे पातळ काप करून घेतले.
  6. हिरव्या मिरच्या चिरून घेतल्या.
  7. गुळ किसून घेतला.
  8. दोन भाग केलेले शेंगदाणे, खोबर्याचे काप आणि मिरच्या थोड्या तेलावर भाजून घेतले.
  9. भिजलेल्या चिंचेतून चिंचेचे पाणी काढून घेतले.
  10. आता चिंचेचे पाणी आणि गुळ एकत्र करून एकजीव करून घेतले.
  11. त्यातच भाजलेले शेंगदाणे, मिरच्या, खोबरे, शेंगदाणे कुट,तीळाचे कुट घालून मिक्स करून घेतले.
  12. एका पँनमध्ये तेल करून जिरे घातले.
  13. जिरे तडतडल्यावर तयार मिश्रण घालून ढवळले.
  14. चवीप्रमाणे मीठ घालून मिश्रण थोडे घट्ट होत आल्यावर गँसवर बंद केला.
  15. आणि तयार झाले पंचामृत

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर