Photo of Chivada by deepali oak at BetterButter
580
1
0.0(0)
0

चीवडा

Sep-21-2018
deepali oak
15 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चीवडा कृती बद्दल

गौरीपूजनसाठी गोडाचा नैवेद्य दाखवतात तसेच तिखट पदार्थाचा सुध्दा नैवेद्य दाखवण्याची पध्दत काही ठिकाणी आहे.नंतर हे गोड तिखट पदार्थ प्रसाद म्हणून वाटले जातात चला बघुया नैवेद्य म्हणून तिखट चीवड्याची रेसिपी.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 10

  1. पातळ पोहे एक किलो ऊन्हात वाळवलेले
  2. डाळे १ मोठ्ठी वाटी
  3. शेंगदाणे एक मोठ्ठी वाटी
  4. सुके खोबरे पातळ चीरून एक पुर्ण वाटी
  5. तेल एक मोठे भांड
  6. मीरच्या २०-२५
  7. जीरे एक चमचा
  8. मोहरी एक चमचा
  9. बडीशेप एक चमचा
  10. लसूणकांदा सोलुन ठेचून (ऐच्छिक)
  11. लिंबू रस एक
  12. कढीपत्ता अर्धी वाटी
  13. साखर चवीनुसार
  14. मीठ चवीनुसार
  15. हळद मोठा एक चमचा
  16. हिंग अर्धा चमचा

सूचना

  1. कढईत लहान एक चमचा तेल घालून थोडे थोडे पातळ पोहे घेऊन छान कुरकुरीत भाजुन घ्या
  2. थोडे थोडे पोहे जसे जसे भाजुन होतिल तसे ते परातीत किंवा टिशु पेपरवर काढत रहा
  3. सगळे पोहे कुरकुरीत झाले कि त्याच कढईत तेल घालून खोबऱ्याचे पातळ काप सोनेरी रंगावर तळुन पोह्यावर घाला
  4. आता शेंगदाणे कुरकुरीत तळुन घ्या व डाळे सुध्दा तळुन घ्या
  5. दोन्हि पोह्यावर ओता
  6. आता कढईत जास्त तेल तापवा त्यात जीरे मोहरी बडीशेप घाला
  7. आता ठेचलेला लसूण मीरच्या कढीपत्ता घाला
  8. लसूण कुरकुरीत झाला कि लिंबुरस हळद व हिंग घाला
  9. हि खमंग फोडणी पोह्यावर ओता
  10. आता मीठ व साखर घालून अलगद हातानी चीवडा मीक्स करा
  11. सगळी कडुन मीक्स झाला कि जाड बुडाच्या मोठ्या पातेलीत चीवडा घ्या
  12. हे पातेले मंद आचेवर गैसवर ठेवा व पातेलीत चीवडा गरम करा ५/१० मीनिटानी गैस बंद करा
  13. गार झाला कि तयार तुमचा गौराईचा नैवेद्य व वाटायला प्रासादही...

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर