मुख्यपृष्ठ / पाककृती / "मावा ड्रायफ्रुटस ट्राय कलर मोदक"

Photo of Mava Dry Fruits Tri Colour Modak by Manisha Lande at BetterButter
973
3
0.0(0)
0

"मावा ड्रायफ्रुटस ट्राय कलर मोदक"

Sep-24-2018
Manisha Lande
5 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

"मावा ड्रायफ्रुटस ट्राय कलर मोदक" कृती बद्दल

मी सांजोरया केल्या आहेत पण याला मी मोदकांचा आकार दिला आहे यात मी मैद्याचा वापर न करता गहू पीठ वापरले आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • डेजर्ट

साहित्य सर्विंग: 4

  1. १ १/२ वाटी गहु पीठ
  2. १/२ वाटी मावा
  3. १/२ मोठा चमचा साखर
  4. १/२ मोठा चमचा साजुक तुप
  5. १/४ मोठा चमचा कॉर्नफ्लॉवर
  6. १/२ मोठा चमचा काजू बदाम पिस्ता यांची पुड
  7. चिमुटभर दुधात भिजवलेले केशर
  8. खायचा हिरवा व लाल रंग
  9. चिमुटभर मीठ
  10. तेल

सूचना

  1. प्रथम गहु पीठ घेवुन त्यात चिमूटभर मीठ, थोडं तेल व आवश्यकतेनुसार पाणी घालुन घट्ट कणिक भिजवुन घेवुन ते झाकून ठेवलं.
  2. कढई गरम झाल्यावर त्यात मावा छान परतून घेतला नंतर त्यात साखर व दुधात भिजवलेले केशर चे मिश्रण, काजू बदाम पिस्ता यांची पुड घालून सर्व छान एकजीव करून घेतले.
  3. भिजवलेल्या कणिक चे तीन एकसमान गोळे करून एका गोळ्याला खायचा हिरवा रंग लावून तो घट्ट मळुन घेतला, दुसरा गोळा घेवुन त्याला खाण्याचा लाल रंग लावून तो घट्ट मळुन घेतला तिसरा गोळा असाच ठेवला.
  4. १/२ मोठा चमचा तुपात १/४ मोठा चमचा कॉर्नफ्लॉवर घालून छान फेसुन त्याचा साटा तयार केला.
  5. लाल रंगाचा गोळा घेवुन पोलपाटवर ठेवून मोठी पोळी लाटुन बाजूला ठेवली, नंतर हिरवा रंगाच्या गोळयाची पोळी लाटून बाजूला ठेवली, नंतर साध्या गोळ्याची पोळी लाटली.
  6. लाल रंगाची पोळी घेवुन त्या पुर्ण पोळीवर तुप व कॉर्नफ्लॉवर पासुन बनवलेला साटा लावून त्यावर हिरव्या रंगाची पोळी ठेवून त्यावर साटा लावून त्यावर लाटलेली साधी मोठी पोळी ठेवून त्याचा व्यवस्थित व घट्ट रोल करुन घेतला.
  7. तयार रोलचे सुरीने काप करुन त्याचे पापुद्रे वरच्या साईडला येतील असे दाबुन त्यांच्या लाटया करुन घेतल्या.
  8. पापुद्रे वरच्या दिशेने येतील अशा लाटया लाटुन त्या पारीत मावा ड्रायफ्रुटस चे मिश्रण घालून पारीला मोदकाच्या कळ्या घालुन मोदक करुन घेतले.
  9. गरम तेलात मंद आचेवर हे मोदक छान डीप फ्राय करुन तळुन घेतले.
  10. केळीच्या पानावर फुलांची आरास करुन त्यात हे "मावा ड्रायफ्रुटस ट्राय कलर मोदक" सर्व्ह केले.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर