Photo of Kalajamun by Sanika SN at BetterButter
192
2
0.0(0)
0

कालाजाम

Sep-24-2018
Sanika SN
0 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कालाजाम कृती बद्दल

स्वादिष्ट गोडाची पाककृती

रेसपी टैग

  • मध्यम
  • फेस्टिव
  • नॉर्थ इंडियन
  • फ्रायिंग
  • डेजर्ट

साहित्य सर्विंग: 4

  1. २०० ग्राम खवा किसून घेणे
  2. १ वाटी पनीर किसून घेणे
  3. ५ टेस्पून मैदा
  4. दीड टेस्पून दूध
  5. २ वाट्या साखर
  6. दीड वाट्या पाणी
  7. वेलचीपूड व वेलचीदाणे
  8. १/४ टीस्पून लिंबाचा रस
  9. पिस्ते
  10. चांदीचा वर्ख

सूचना

  1. साहित्य
  2. एका बाऊलमध्ये पनीर चांगले मऊसूत मळून घ्या.
  3. किसलेला खवा ही चांगला मळून घ्या.
  4. आता मळलेले पनीर, खवा, मैदा, दूध व १/२ चमचा साखर एकत्र करून मळून घेणे.
  5. तयार मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करुन घ्या.
  6. प्रत्येक गोळ्यात एक पिस्ता व वेलचीदाणे भरून गोल वळून घ्या.
  7. गोळे हलक्या हाताने वळा, एकही भेग / चीर पडता कामा नये.
  8. कढईत तूप गरम करायला ठेवावे.
  9. एकीकडे पॅनमध्ये साखर + पाणी एकत्र करून पाक करायला ठेवावा.
  10. साखर पूर्णपणे विरघळली की त्यात १/४ चमचा लिंबाचा रस घालून घेणे.
  11. तूप गरम झाले की तयार गोळे त्यात सोडा. गोळे हळू-हळू वर आले म्हणजे तूपाचे तापमान योग्य आहे असे समजावे.
  12. झारा गोलाकार फिरवत रहा म्हणजे सर्व्ह गोळे समान तळले जातील.
  13. कालाजाम करायचे आहेत म्हणून थोडे जास्त तळावे लागतात.
  14. एकतारी पाक तयार झाली की त्यात वेलचीपूड घालून एकत्र करावे.
  15. तळलेले कालाजाम आता कोमट पाकात घालून मुरू द्यावे.
  16. कालाजाम मुरायला साधारण ५-६ तास लागतात.
  17. तयार कालाजामावर चांदीचा वर्ख लावून सजवावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर