मुख्यपृष्ठ / पाककृती / स्टफ्ड पिस्ता मोदक

Photo of Stuffed Pista Modak by Sanika SN at BetterButter
300
2
0.0(0)
0

स्टफ्ड पिस्ता मोदक

Sep-25-2018
Sanika SN
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

स्टफ्ड पिस्ता मोदक कृती बद्दल

झटपट व स्वादिष्ट मोदक

रेसपी टैग

  • सोपी
  • फेस्टिव
  • डेजर्ट

साहित्य सर्विंग: 4

  1. २०० ग्राम खवा किसून
  2. १/२ वाटी + थोडीच जास्तं पिठीसाखर
  3. पिस्त्यांची पूड आवडीप्रमाणे प्रमाण घ्यावे
  4. १ चमचा वेलचीपूड
  5. चांदीचा वर्ख सजावटीसाठी

सूचना

  1. साहित्य
  2. नॉन-स्टिक कढईत खवा मंद आचेवर परतायला घ्या.
  3. हळू-हळू खवा मऊ होऊ लागेल.
  4. त्यात आता पिठीसाखर मिसळा. पिठीसाखरेमुळे मिश्रण आधी पातळ होईल. (तुम्हाला हवे असल्यास या पायरीला यात केशरमिश्रीत दूध घालावे)
  5. सतत परतत राहावे, हळू-हळू खव्याचे मिश्रण गोळा होऊ लागेल तसा गॅस बंद करावा.
  6. मिश्रण एका ताटात काढून जरा थंड होऊ द्यावे.
  7. हाताला सोसवेल इतके थंड झाल्यावर त्यात वेलचीपूड मिक्स करावी.
  8. खव्याच्या मिश्रणातला १/४ भाग वेगळा काढून त्यात पिस्तापूड मिक्स करावी व त्याचे लहान-लहान गोळे करावे.
  9. आता पेढे-मोदकाच्या साच्याला तुपाचा हात लावून त्यात साध्या खव्याचा छोटा गोळा घ्यावा व त्यात पिस्त्याचा गोळा ठेवून मोदकाचा आकार ध्यावा.
  10. तयार मोदकावर चांदीचा वर्ख लावून सजवावे.
  11. मोदक नैवेद्यासाठी तयार आहेत.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर