मुख्यपृष्ठ / पाककृती / तेलची / सांजोरी

Photo of Telchi/ Sanjori by Archana Lokhande at BetterButter
0
2
0(0)
0

तेलची / सांजोरी

Sep-25-2018
Archana Lokhande
0 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
7 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

तेलची / सांजोरी कृती बद्दल

ही एक महाराष्टीयन डिश आहे. लग्न कार्यात केली जाते. पण आमच्याकडे गौरी गणपतीमध्ये गौरींला नैवेद्यासाठी केली जाते.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 7

  1. गहू १/२ किलो
  2. गुळ १/२ किलो
  3. तेल तळण्यासाठी
  4. बडीशेप+वेलची पावडर ४-५ चमचे
  5. गव्हाचे पीठ २-३ वाटी
  6. मीठ
  7. पाणी

सूचना

  1. एका कढईत गहू किंचित तेल घालून लालसर भाजून घेतले.(भाजले हे ओळखण्यासाठी गहू भाजल्यावर छान फुलतात तेव्हा समजावे गहू भाजले.)
  2. गुळ किसून घेतला.
  3. एका पातेल्यात गुळ आणि एक वाटी पाणी घालून गुळाचा एक तारी पाक तयार करून घेतला.
  4. गहू थंड झाल्यावर मिक्सरवर दळून घेतले.(मिक्सर बंद-चालू, बंद-चालू असे करून दळून घेतले.)
  5. दळलेले गहू चाळणीने चाळून पीठ बाजूला काढून घेतले.
  6. पाक गाळून घेतला.
  7. गाळलेल्या पाकात दळलेले गहू आणि बडीशेप वेलची पूड घालून मिक्स करून घेतले.
  8. हे मिश्रण रात्रभर भिजत ठेवले.(रात्रभर भिजवून दुसऱ्या दिवशी करावे)
  9. आता गव्हाच्या पिठात मीठ घालून कणीक भिजवून १० मिनिटे ठेवून दिली.
  10. सांजा छान फुलून येतो. तो जास्त कोरडा किंवा जास्त ओला असू नये. कोरडा असेल तर थोडे कोमट पाणी घालावे..आणि जास्त ओला असेल तर दळलेले गहू चाळल्यावर जे पीठ उरते ते थोडे पीठ घालावे.
  11. कढईत तेल गरम होण्यास ठेवले.
  12. कणकेचा छोटा गोळा घेऊन त्याची वाटी करून त्यात मावेल तेवढा सांजा भरून घेतला.
  13. त्याची छोटी पोळी लाटून घेतली.
  14. गरम तेलात सोडून मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी लालसर तळून घेतली.
  15. तयार तेलचीचा/सांजोरीचा नैवैद्य दाखवला.
  16. ही तेलची साजूक तूप आणि दुधासोबत खुप छान लागते.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर