Photo of Raw Mango Daal by Sanika SN at BetterButter
729
1
0.0(0)
0

आंबेडाळ

Sep-25-2018
Sanika SN
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

आंबेडाळ कृती बद्दल

कैरीची चविष्ट डाळ.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • लोणचं / चटणी वगैरे

साहित्य सर्विंग: 4

  1. १ वाटी चण्याची डाळ ५-६ तास भिजवलेली
  2. १/२ वाटी कैरीचा कीस
  3. १ इंच आले
  4. १ हिरवी मिरची
  5. १ टेस्पून हिरव्या मिरचीची पेस्ट 
  6. १/२ टीस्पून साखर
  7. १/२ टीस्पून हळद
  8. १/४ टीस्पून हिंग 
  9. १/२ टीस्पून मोहरी
  10. मीठ चवीनुसार
  11. चिरलेली कोथिंबीर
  12. खवलेला ओला नारळ वरुन घालण्यासाठी

सूचना

  1. डाळीतले संपूर्ण पाणी काढून डाळ निथळून घेणे.
  2. मिक्सरच्या भांड्यात डाळ,आले व एक हिरवी मिरची  एकत्र करून, पाणी न घालता भरडसर वाटून घेणे.
  3. वाटलेल्या डाळीत कैरीचा कीस, साखर, मीठ व चिरलेली कोथिंबीर घालून चांगले मिक्स करावे.
  4. तेलाच्या बुट्टीत तेल गरम करुन मोहरी, हिंग व हळदीची खमंग फोडणी करावी व आंबेडाळीवर ओतावी. गरज पडल्यास मीठ आणखीन घालावे.
  5. वरून ओला नारळ  घालून सजवावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर