मुख्यपृष्ठ / पाककृती / पूरणपोळी

Photo of Puranpoli by Ujwala Surwade at BetterButter
254
1
0(0)
0

पूरणपोळी

Sep-27-2018
Ujwala Surwade
35 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पूरणपोळी कृती बद्दल

सणासुदीला केली जाणारी पारंपरिक रेसिपी. परंतु बैलपोळ्याच्या दिवशी खास करून केली जाते.

रेसपी टैग

 • Tossing (Mixing with a spoon / spatula)
 • होळी
 • व्हेज
 • मध्यम
 • महाराष्ट्र
 • पॅन फ्रायिंग
 • प्रेशर कूक
 • ब्लेंडींग
 • बॉइलिंग
 • सौटेइंग
 • बेसिक रेसिपी
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

 1. हरभरा (चनाडाळ)१ वाटी
 2. गूळ सपाट वाटी कापलेला
 3. वेलचीपूड
 4. जायफळ
 5. साजूक तूप
 6. गव्हाची कणीक २वाट्या
 7. मीठ
 8. तेल
 9. पाणी

सूचना

 1. प्रथम डाळ धुऊन घ्यावी.
 2. नंतर अर्धा तास भिजत ठेवावी
 3. तोपर्यंत कटोऱ्यात कणिक मीठ तेल घालून
 4. छान मळून झाकून ठेवावी.
 5. अर्ध्या तासानंतर डाळ कुकर ला लावावी
 6. ३ते४शिट्ट्या झाल्यावर गँस बंद करा
 7. डाळ शिजेपर्यंत गूळ कापून घ्या.
 8. कुकर गार झाल्यावर उघडून बघा .
 9. डाळ मध्ये पाणी असल्यास काढून घ्या
 10. हे पाणी आमटी साठी वापरतात
 11. नंतर डाळ चमच्याने हलवून घ्यावी.
 12. पुन्हा गँसवर कुकर झाकण न लावता ठेवा
 13. एव्हाना राहीले ले पाणी सुद्धा आटून डाळ
 14. छान सुकी वाटत असेल. मग त्यात गूळ
 15. घालून पुरण शिजवून घ्या. परतत रहावे
 16. नंतर तूप टाका पुरणामध्ये.आणि परतत रहा
 17. पुरण तयार झाले की पुरणाच्या गाळणी
 18. मध्ये गार झाल्यावर पुरण तयार करून घ्यावे
 19. गँसवर तवा तापायला ठेवा. कणिक छान
 20. मुरली असेल कणकेचे लिंबाएवढे २गोळे
 21. करून त्याच्या पुरीएवढ्या लाटून घ्या
 22. नंतर एक पुरी खाली ठेवा .मध्ये पुरण भरा
 23. पुरणावर कोरडी कणीक भुरभुरावी
 24. नंतर वरून दुसरी पुरी ठेवून कडा सर्व बाजूने
 25. छान दाबून बंद करा .पोळपाटावर कणीक
 26. टाकून हलक्या हाताने लाटून तव्यावर
 27. तूप लावून खरपूस भाजून घ्यावी
 28. अश्या प्रकारे पूरणपोळी खाण्यासाठी तयार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर