मुख्यपृष्ठ / पाककृती / फ्रेश फ्रुट मोदक

Photo of Fresh Fruit Modak by archana chaudhari at BetterButter
538
1
0.0(0)
0

फ्रेश फ्रुट मोदक

Sep-30-2018
archana chaudhari
15 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

फ्रेश फ्रुट मोदक कृती बद्दल

मोदकाचा हा वेगळा प्रकार चवीला खूपच छान लागतो.

रेसपी टैग

  • मध्यम
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • सौटेइंग

साहित्य सर्विंग: 10

  1. सारणासाठी-
  2. सफरचंद २ टेबलस्पून(बारीक तुकडे चिरून)
  3. पीअर २ टेबलस्पून( बारीक तुकडे चिरून)
  4. किवी १ टेबलस्पून ( बारीक तुकडे चिरून)
  5. संत्र १ टेबलस्पून( बारीक तुकडे चिरून)
  6. लिंबू रस २ थेंब
  7. दालचिनी १ चिमूट
  8. मिक्स फ्रुट जॅम १ टेबलस्पून
  9. बटर १ टीस्पून
  10. कव्हरसाठी-
  11. मैदा १/२ कप
  12. तेल १ टीस्पून
  13. मीठ चिमूटभर
  14. तळण्यासाठी तेल

सूचना

  1. सारण बनविण्यासाठी एक कढईत बटर गरम करा.
  2. त्यात सगळे कापलेली फळे टाका,१० मिनिटे कमी आचेवर परतत रहा.
  3. आता मिक्सफ्रुट जॅम घाला आणि दालचिनीची पावडर घाला.
  4. १ते२ मिनिट परतवून गॅस बंद करा.
  5. एक वाटीत सारण काढून ठेवा.
  6. कव्हरसाठी मैदा,मीठ,तेल एकत्र करून थोड्या पाण्यात भिजवून घ्या.१०मिनिटे झाकून ठेवा.
  7. आता मैद्याच्या गोळ्यांचे सारखे भाग करून प्रत्येकाची पुरी लाटून घ्या.
  8. पुरीमध्ये सारण भरून मोदक बनवून घ्या.
  9. या प्रमाणे सगळे मोदक बनवा.
  10. मध्यम आचेवर तेलात सोनेली रंग येईपर्यंत तळून घ्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर