मुख्यपृष्ठ / पाककृती / स्टॉबेरीे बासबऊसा

Photo of Strawberry Basbousa by seema Nadkarni at BetterButter
530
1
0.0(0)
0

स्टॉबेरीे बासबऊसा

Sep-30-2018
seema Nadkarni
60 मिनिटे
तयारीची वेळ
40 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

स्टॉबेरीे बासबऊसा कृती बद्दल

हि एक स्वीट चा प्रकार आहे.. अरेबिक स्वीट डिश आहे..

रेसपी टैग

  • एग फ्री
  • मध्यम
  • फेस्टिव
  • मिडल ईस्टर्न
  • बेकिंग
  • डेजर्ट
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 कप बारीक रवा
  2. 1/4 कप लोणी / तुप
  3. 1 कप दूध
  4. 1/2 कप खोबऱ्याचे कीस
  5. 1 टी स्पून बेकिंग पावडर
  6. 1/4 कप स्टॉबेरीे क्रश अथवा ( 1/2 कप साखर)
  7. 10-12 बदाम ची काप
  8. 1 कप साखर
  9. 1/2 कप पाणी
  10. 1/2 टी स्पून लिंबाचा रस
  11. 1 टी स्पून स्टॉबेरीे इसेन्स ( गुलाब पाणी वापरू शकता)

सूचना

  1. एका बाउल मध्ये साखर व पाणी एकत्र करून पाक तयार करून घ्या. त्यात इसेन्स घालून थंड करण्यासाठी ठेवावे.
  2. एका बाउल मध्ये लोणी व दूध एकत्र करून बीटर नी एक रस करावे.
  3. त्यात स्टॉबेरीे क्रश किंवा साखर घालून परत एकदा एकरस करून घ्यावे.
  4. त्यात रवा, थोडे मीठ आणि बेकिंग पावडर घालून एकत्र करावे.
  5. आता त्यात खोबऱ्याचे कीस घालून एकत्र करावे.. इडली चे पीठ असते तसे मिश्रण तयार होइल..
  6. ओवन ला 200 'से. प्री हिट करून घ्या.
  7. बेकिंग ट्रे मध्ये बटर पेपर ठेवून त्यात वरील पीठा चे मिश्रण घालून घ्या.
  8. त्या मिश्रणा वर बदाम ची काप लावून घ्या
  9. 10 मिनिटांनी प्री हिट झालेल्या ओवन मध्ये ठेवून 40 मिनिटे बेक करुन घ्या.
  10. बेक झाल्यावर त्यावर साखरेचा पाक घालून 1/2 तास ठेवून घ्यावे.
  11. पाक मूरला की त्याचे तुकडे हळूच ट्रे मधून बाहेर काढावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर