मुख्यपृष्ठ / पाककृती / मिश्र धान्यांचे पौष्टिक अप्पे

Photo of POUSHTIK APPE by Aditi Bhave at BetterButter
598
2
0.0(0)
0

मिश्र धान्यांचे पौष्टिक अप्पे

Oct-05-2018
Aditi Bhave
600 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मिश्र धान्यांचे पौष्टिक अप्पे कृती बद्दल

डाळी, भाज्या घालून केलेले छान अप्पे. एक पोटभरीचा प्रोटीन युक्त नाश्ता

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. उडीद डाळ- पाव वाटी
  2. हिरव्या सालाची मूग डाळ - पाव वाटी
  3. पिवळी मूग डाळ - पाव वाटी
  4. हरभरा डाळ- पाव वाटी
  5. मसूर डाळ- पाव वाटी
  6. तांदूळ - अडीच वाटी
  7. मेथ्या - 1 चमचा
  8. पोहे - 1 वाटी
  9. गाजर किसून - पाव वाटी
  10. कोबी बारीक चिरून - पाव वाटी
  11. कॉर्न - अर्धी वाटी
  12. कोथिंबीर - पाव वाटी
  13. आलं किसलेले - 2 चमचे
  14. तिखट - चवीनुसार
  15. मीठ- चवीनुसार

सूचना

  1. साहित्य
  2. सर्व डाळी व तांदुळ धुवून घ्याव्यात . त्यात मेथ्या घालून, पाणी घालून 4 तास भिजवत ठेवावे.
  3. नंतर हे सर्व मिक्सरमध्ये वाटून घ्यावे. वाटताना त्यात पोहे घालावेत व सर्व मिश्रण एकत्र बारीक वाटावे. 4 तास हे मिश्रण झाकून ठेऊन द्यावे.
  4. सर्व भाज्या धुवून चिरून घ्याव्यात.
  5. या भाज्या , मिठ, तिखट घालून मिक्स करावे.
  6. अप्पे पात्र तेल लावून तापत ठेवावे. गरम झाले की त्यात चमच्याने हे मिश्रण घालावे .
  7. झाकून ठेवावे. 5 मिनिटांनी परतावे . दोन्ही बाजूंनी खरपूस भाजावे .
  8. चटणी बरोबर सर्व्ह करावे पौष्टिक अप्पे.
  9. सगळ्या डाळी असल्याने , त्याचा स्वाद यात उतरतो आणि खमंग लागतात. पोह्यामुळें हलके होतात.
  10. भाज्या खाताना मुले कंटाळा करतात मग अशी कल्पना लढवली.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर