मुख्यपृष्ठ / पाककृती / छोले फ्रँकि

Photo of Chole Frankie by Vaishali Joshi at BetterButter
1114
2
0.0(0)
0

छोले फ्रँकि

Oct-05-2018
Vaishali Joshi
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

छोले फ्रँकि कृती बद्दल

बरेचदा रात्रि बनविलेले छोले उरतात तर काय करावे बर ? दुसरया दिवशी सकाळी त्याचा चटपटीत असा ब्रेकफास्ट करू शकतो की . तर अशाच उरलेल्या छोल्यांची फ्रँकि बनविली

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • इंडियन
  • रोस्टिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. तयार छोले ११/२ कप
  2. गव्हाचे पीठ १ कप
  3. तेल
  4. बटर
  5. चाट मसाला
  6. कांदा १ बारीक़ चिरलेला
  7. टोमेटो १ बारीक़ चिरलेला
  8. हिरवी मिरच्या २
  9. पिझा सॉस
  10. लिंबू रस
  11. मीठ

सूचना

  1. गव्हाचे पीठ घेउन त्यात मीठ आणि तेल घालून पाण्याने भिजवून ठेवावी , छोले कुस्करून घ्यावे
  2. कुस्करलेल्या छोल्यांत चाट मसाला , कोथिंबीर , लिंबाचा रस घालून मिक्स करून घ्यावे
  3. मग त्याचे समान भाग करून मुठे करून घ्यावे आणि ते हातानी लांबट चापट टिक्किया करून त्या बटर आणि तेल मिक्स करून तव्या वर दोन्ही बाजूने रोस्ट करावे
  4. आता भिजवलेल्या पीठाचे समान गोळे करून घेउन पातळ पोळ्य़ा लाटून तव्यावर दोन्ही बाजूने अर्धवट शिजवून घ्याव्या .
  5. मग फ्रंकी करायला घेउ - तव्यावर बटर घालून त्यावर अर्धवट शिजवलेली पोळी टाका ती एक बाजूने थोड़ी रोस्ट करून पलटवा आणि पहिले त्यावर पिझा सॉस लावा वर मधोमध छोल्याची टिक्की ठेवा
  6. टिक्की हातानी अजुन लांब पसरवून ठेवा त्यावर कांदा , टोमेटो , कोथिंबीर , मिर्ची घाला आणि चाट मसाला वरून भुरभुरवा आणि दोन्ही बाजु फोल्ड करून फ्रँकि बनवून घ्या
  7. तयार फ्रँकि सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर