मुख्यपृष्ठ / पाककृती / सोयाचंक्स खीमा मोमोज

Photo of Soyachunks Kheema Momos by Manisha Lande at BetterButter
480
2
0.0(0)
0

सोयाचंक्स खीमा मोमोज

Oct-06-2018
Manisha Lande
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सोयाचंक्स खीमा मोमोज कृती बद्दल

सोयाचंक्स खीमा मोमोज खुपच टेस्टी व चविष्ट पदार्थ आहे आणि स्नॅक किंवा लहान मुलांना टिफिन मध्ये देण्यास उत्तम पर्याय आहे कारण त्यात खीम्याचे सारण आहे त्यात सोयाचंक्स आहेत आणि त्यात प्रोटीन्स भरपूर प्रमाणात असतं त्यामुळे खुप पौष्टिक देखील आहे. हे मोमोज बनविताना मी फक्त गहु पीठ वापरले आहे, मैदा बिलकुल वापरला नाही.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • प्रेशर कूक
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 4

  1. सारण साहित्य :
  2. १ वाटी सोयाचंक्स
  3. १ मोठा बारीक चिरलेला कांदा
  4. १ मोठा बारीक चिरलेला टोमॅटो
  5. २ मोठे चमचे फेटलेलं दही
  6. १/३ मोठा चमचा आलं-लसुण पेस्ट
  7. १ तमालपत्र
  8. १ लवंग
  9. १ दालचिनी तुकडा
  10. १ काळी मिरी
  11. १/४ छोटा चमचा बडीशेप
  12. १/४ छोटा चमचा जिरं
  13. १ मोठा चमचा लाल तिखट
  14. १/२ छोटा चमचा धने-जीरे पुड
  15. १/२ छोटा चमचा किचन किंग मसाला
  16. १/४ छोटा चमचा चाट मसाला
  17. चिमूटभर हिंग
  18. १/२ लिंबू रस
  19. 2 मोठे चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर
  20. चवीनुसार मीठ
  21. तेल
  22. आवरण साहित्य :
  23. १ वाटी गहु पीठ
  24. तेल
  25. चवीनुसार मीठ

सूचना

  1. प्रथम नेहमीप्रमाणे गव्हाची कणिक मळुन घेतली व झाकून ठेवली.
  2. सोयाचंक्स १५ मिनिटे गरम पाण्यात भिजत घातले.
  3. सोयाचंक्स मधील पाणी काढून मिक्सरमधून बारीक दरदरीत वाटले.
  4. सोयाचंक्सच्या मिश्रणात फेटलेलं दही, १/२ छोटा चमचा लाल तिखट, व थोडं मीठ घालून अर्धा तास मॅरिनेट करुन ठेवले.
  5. कढई गॅसवर ठेवून त्याततेल घालुन ते गरम झाल्यावर त्यात बारीक चिरलेला कांदा, तमालपत्र, बडीशेप, लवंग, जिरं, काळी मिरी, दालचिनी तुकडा, आलं-लसूण पेस्ट घालून कांदा छान सोनेरी रंगावर खमंग भाजून घेतला.
  6. नंतर त्यात बारीक चिरलेला टोमॅटो घालून तेल सुटेपर्यंत परतून घेतला.
  7. नंतर त्यात मॅरिनेट केलेले सोयाचंक्स, धने-जीरे पुड, लाल तिखट, किचन किंग मसाला, चाट मसाला, चवीनुसार मीठ व थोडं पाणी घालुन सर्व मिश्रण एकजीव करून घेतले.
  8. सोयाचंक्सच्या खीम्यात लिंबू रस, व बारीक चिरलेली कोथिंबीर घालून खीमा परतून थोडा कोरडा करून घेतला.
  9. मळलेल्या कणिकेचे गोळे करुन त्याची पारी करुन त्यात खीमा भरुन त्याला निरनिराळे मोमोज चे आकार देवून मोमोज बनविले.
  10. प्रेशर कुकरमध्ये असलेल्या पसरट भांड्याला तेलाचे ग्रिसिंग करून त्यात तयार मोमोज ठेवले.
  11. प्रेशर कुकरची शिट्टी काढून कुकर गॅसवर ठेवून मोठया आचेवर मोमोज १० मिनिटे शिजवून घेतले.
  12. तयार मोमोज सर्व्हिंग डिशमध्ये काढून टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह केले.
  13. "सोयाचंक्स खीमा मोमोज" खाण्यासाठी तयार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर