ढाबा स्टाईल छोले / चना मसाला | Dhaba Style Chole / Chana Masala Recipe in Marathi

प्रेषक Manisha Lande  |  12th Oct 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Photo of Dhaba Style Chole / Chana Masala by Manisha Lande at BetterButter
ढाबा स्टाईल छोले / चना मसालाby Manisha Lande
  • तयारी साठी वेळ

    8

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    25

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

7

0

ढाबा स्टाईल छोले / चना मसाला recipe

ढाबा स्टाईल छोले / चना मसाला बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Dhaba Style Chole / Chana Masala Recipe in Marathi )

  • १/२ मोठा चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर
  • गरम पाणी
  • तेल
  • चवीनुसार मीठ
  • १/2 छोटा चमचा कश्मिरी लाल तिखट
  • १ छोटा चमचा किचन किंग मसाला
  • १ छोटा चमचा धने-जीरे पुड
  • १/२ छोटा चमचा हळद
  • १ मोठा चमचा लाल तिखट
  • १ मोठा चमचा आलं-लसुण पेस्ट
  • २ मोठे चमचे बेसन
  • १ मोठा बारीक चिरलेला टोमॅटो
  • १ मोठा बारीक चिरलेला कांदा
  • १ वाटी काबुली चणे / छोले

ढाबा स्टाईल छोले / चना मसाला | How to make Dhaba Style Chole / Chana Masala Recipe in Marathi

  1. प्रथम काबुली चणे / छोले ७ ते ८ तास पाण्यात भिजत ठेवले.
  2. नंतर त्यातलं पाणी काढून प्रेशर कुकर मध्ये छोले बुडतील इतके पाणी घालुन त्यात छोले व चिमूटभर मीठ घालून ७ ते ८ शिटट्या काढून छोले शिजवून घेतले.
  3. कढई गॅसवर ठेवून त्यात बेसन घालून ते कोरडंच सोनेरी रंगावर खमंग भाजून घेतले व बाजूला ठेवले.
  4. त्याच कढईत तेल घालुन ते गरम झाल्यावर त्यात जिरं, बारीक चिरलेला कांदा,आलं-लसुण पेस्ट घालून छान सोनेरी रंगावर भाजून घेतला.
  5. नंतर त्यात बारीक चिरलेला टोमॅटो घालून तेल सुटेपर्यंत व त्याचा कच्चट वास जाईपर्यंत परतून घेतला.
  6. नंतर त्यात भाजलेले बेसन घालून ते कांद्याच्या मिश्रणाबरोबर एकजीव करून घेतले.
  7. नंतर त्यात लाल तिखट, हळद, धने-जीरे पुड, किचन किंग मसाला, कश्मिरी लाल तिखट घालून सर्व मिश्रण व भसाले छान एकजीव करून घेतले.
  8. नंतर त्यात वाफवलेले छोले घालून परतले.
  9. नंतर त्यात ग्रेव्ही जितकी पातळ हवी तितकं छोले शिजवताना वापरलेलं गरम पाणी, चवीनुसार मीठ घालून मध्यम आचेवर शिजवून एक उकळी येईपर्यंत शिजवून घेतले.
  10. नंतर तयार छोले / चना मसाला सर्व्हींग बावुलमध्ये काढून वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गरमागरम सर्व्ह केलं.
  11. "ढाबा स्टाईल छोले / चना मसाला" तयार.

Reviews for Dhaba Style Chole / Chana Masala Recipe in Marathi (0)