मुख्यपृष्ठ / पाककृती / चवळीच्या शेंगाची भाजी

Photo of Green Long Beans Veggie by Shraddha Juwatkar at BetterButter
813
1
0.0(0)
0

चवळीच्या शेंगाची भाजी

Oct-13-2018
Shraddha Juwatkar
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चवळीच्या शेंगाची भाजी कृती बद्दल

चवळीच्या शेंगांत व्हिटॅमिन ए, बी, सी व प्रोटीन, कार्बोहाइड्रेट आणि कॅल्शियम आहे ही भाजी डोळ्यांची उष्णता दूर करते. आहारात ह्या भाजीचा आठवड्यातून एकदा तरी समावेश झाला पाहिजे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • बेसिक रेसिपी

साहित्य सर्विंग: 5

  1. पाव किलो चवळीच्या शेंगा
  2. एक मध्यम आकाराचा कांदा
  3. एक बटाटा बारीक फोडी करून
  4. 3/4 हिरव्या मिरच्या
  5. फोडणी साठी तेल, मोहरी, कढीपत्ता
  6. अर्धी वाटी किसलेले ओले खोबरे व थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर

सूचना

  1. शेंग्यांचे कडेचे धागे काढून टाकावेत आणि शेंगा स्वच्छ धुवून निथळून घ्याव्यात.
  2. कांदे, बटाटे व मिरच्या बारीक चिरून घ्यावेत
  3. कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, कढीपत्ता व मिरच्या घालून फोडणी करावी.
  4. कांदा थोडा परतून झाल्यावर बटाटे घालावेत. बटाटे खरपूस परतून झाल्यावर चिरलेली चवळी घालावी. पाच मिनिटे अशीच मंद आचेवर परतत राहावी. मीठ घालावे. पाण्याचा हबका मारून झाकण ठेवून वाफ काढावी.मध्ये मध्ये भाजी परतत राहावी.
  5. चवळीच्या शेंगा कोवळ्या असतील तर भाजी लगेच शिजते नाही तर थोडे पाणी घालून शिजवावे.
  6. बटाटे आणि चवळी बोटाने चेपून बघावी. शिजली असेल तर खोबरे व कोथिंबीर घालून गॅस बंद करावा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर