मुख्यपृष्ठ / पाककृती / तयार भाताचे थालिपीठ

Photo of Rice Thalipeeth by Manisha Lande at BetterButter
1072
4
0.0(0)
0

तयार भाताचे थालिपीठ

Oct-15-2018
Manisha Lande
7 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

तयार भाताचे थालिपीठ कृती बद्दल

छोट्या छोट्या भुकेला देण्यासाठी पटापट होणारा सोपा व चविष्ट पदार्थ आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 4

  1. वाटीभर शिजवलेला तयार भात
  2. १/२‍ वाटी गहु पीठ
  3. १/२ वाटी बेसन
  4. १/४ वाटी किसलेलं गाजर
  5. १ छोटा चमचा लाल तिखट
  6. १/२ छोटा चमचा हळद
  7. १/४ छोटा चमचा हिंग
  8. १/२ छोटा चमचा धने-जीरे पुड
  9. चवीनुसार मीठ
  10. तेल

सूचना

  1. प्रथम मिक्सरमधून तयार भात दरदरीत वाटून घेतला.
  2. नंतर त्यात गहू पीठ, बेसन, किसलेलं गाजर घालून छान एकजीव करून घेतले. ( मी पीठ भिजवताना पाण्याचा वापर केला नाही, गाजरच्या किसाला जे पाणी सुटले मी त्यातच पीठ भिजवले. )
  3. नंतर त्यात लाल तिखट, धने-जीरे पुड, हळद, हिंग व चवीनुसार मीठ घालून मिश्रण छान एकजीव करून घेतले.
  4. गॅसवर तवा तापत ठेवला.
  5. एक दुधाची रिकामी पिशवी घेऊन ती धुवून स्वच्छ करून घेतली.
  6. नंतर ती पिशवी पोलपाटावर ठेवून त्यावर मिश्रणाचा मध्यम आकाराचा गोळा करून त्यावर पाण्याचा हात लावून थालिपीठ थापून घेतलं.
  7. गरम तव्यावर तयार थालिपीठ घालून बाजूंनी तेल सोडून दोन्ही बाजूंनी छान खमंग भाजून घेतलं.
  8. तयार थालिपीठ सर्व्हींग डिशमध्ये काढून टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह केलं
  9. "तयार भाताचे थालिपीठ" तयार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर