मुख्यपृष्ठ / पाककृती / साबुदाणा खिचडी

Photo of Sabudana Khichdi by Manisha Lande at BetterButter
717
2
0.0(0)
0

साबुदाणा खिचडी

Oct-15-2018
Manisha Lande
480 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

साबुदाणा खिचडी कृती बद्दल

अतिशय सुंदर चविष्ट आणि चमचमीत डिश आहे पण आपल्याकडे बहुतेक वेळा फक्त उपवासालाच खाल्ली जाते. पण मला तर वाटतं हे आपण अॅज अ स्नॅक्स किंवा अॅज अ फुल मिल म्हणुन सुद्धा खाऊ शकतो.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • स्टर फ्रायिंग
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 4

  1. १ वाटी साबुदाणा
  2. १ वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कुट
  3. ३ ते ४ हिरव्या मिरच्या
  4. १ छोटा चमचा जिरं
  5. १ मध्यम आकाराचा बटाटा
  6. चवीनुसार मीठ
  7. चवीनुसार साखर
  8. तेल / साजूक तूप ( ऐच्छिक )

सूचना

  1. प्रथम साबुदाणा खिचडी करण्याच्या ७ ते ८ तास आधी साबुदाणा स्वच्छ धुवून पाण्यात तासभर भिजत ठेवून त्यातलं पाणी काढून झाकून ठेवले.
  2. बटाट्याच्या पातळ चकत्या करून घेतल्या.
  3. कढईत २ मोठे चमचे तेल गरम करत ठेवले तेल तापल्यावर त्यात जिरं, कढीपत्याची पानं, हिरव्या मिरच्या उभ्या चिरुन घातल्या.
  4. नंतर त्यात बटाट्याच्या चकत्या घालून छान सोनेरी रंगावर खमंग परतून घेतल्या.
  5. नंतर त्यात भिजवलेले साबुदाणे, शेंगदाण्यांचा कुट, व चवीनुसार मीठ, व थोडी साखर घालून मिश्रण छान एकजीव करून घेतले नंतर त्यावर झाकण ठेवून मध्यम आचेवर शिजवून एक वाफ काढून घेवून खिचडी शिजवून घेतली.
  6. तयार खिचडी सर्व्हींग डिशमध्ये काढून गरमागरम सर्व्ह केली.
  7. "साबुदाणा खिचडी" तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर